नाशिक : ललित पाटील (Lalit Patil) ड्रग्स प्रकरण उघडकीस आल्यानंतर नाशिक पोलिसांपाठोपाठ (Nashik Police) जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून, जिल्हा प्रशासनाने अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. जिल्ह्यातील बंद पडलेल्या कारखान्यांची (Factory) तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्याचबरोबर औद्योगिक वसाहत, पोलीस, कामगार विभाग यांच्यांकडून संयुक्त कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे नाशिकच्या ड्रग्ज प्रकरणावरून आता जिल्हा प्रशासनाच्या कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. 


नाशिक जिल्ह्यात (Nashik District) ड्रग्स प्रकरणी अनेक बाबी पुढे येत असल्याने प्रशासकीय यंत्रणेकडून गंभीर दखल घेण्यात आली असून, या प्रकरणाचा आढावा घेतला जात आहे. संपूर्ण राज्यात गाजत असलेल्या ड्रग्ज प्रकरणाचे केंद्र नाशिकमध्ये असल्याने दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. संपूर्ण राज्यात या प्रकरणाचे गांभीर्य वाढल्याने जिल्ह्यातही दक्षता घेतली जात आहे. नाशिक तालुक्यातील शिंदे (shinde VIllage) गावात एका बंद कारखान्यामध्ये इग्ज इनविण्याचा कारखाना सुरू असल्याचे मुंबई  पोलिसांनी उजेडात आणले होते. नाशिक औद्योगिक वसाहतीतील जे कारखाने बंद आहेत अशा कारखान्याची तपासणी करण्यात यावी, रासायनिक कारखान्या आणि औषध निर्मिती करणारे कारखाने किती दिवसांपासून बंद आहेत आणि सध्या ते काय कामकाज करत आहेत याची तपासणी करण्याचे सूचना एमआयडीसी आणि अन्न व औषध प्रशासन विभागाला जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहेत. 


नाशिक तालुक्यातील शिंदे गावात ड्रग्ज बनविण्याचा कारखाना (Nashik Drugs Factory) सुरु असल्याचा गंभीर प्रकार पोलिसांनी उघडकीस आणल्यानंतर ड्रग्जसाठी बंद कारखान्यांचा वापर होण्याचा संशय बळावल्याने या प्रकरणी एमआयडीसीतील बंद कारखान्यांची तपासणी करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने एमआयडीसीला दिल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व रसायन निर्मिती आणि अन्न औषध निर्मिती कारखान्याची अन्न औषध प्रशासनाच्या वतीने तपासणी केली जाणार आहे. कारखान्यात ज्याची परवानगी आहे, त्याचेच उत्पादन होतेय की इतर काही याचा तपास केला जाणार आहे. त्याचबरोबर अन्न औषध प्रशासन विभागाने शेड्युल ड्रग्स x, H, H1, इनहेलर विक्री करणाऱ्या औषध विक्रेत्यांवर लक्ष ठेवण्याचे, आवक जावक क्रमांक तपासण्याचे आदेश संबंधित ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित नसेल तर ती तत्काळ बसविण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. 


जिल्हा प्रशासनाच्या सूचना 


तसेच राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस प्रशासन यांनी जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात गस्त वाढविण्याच्या सूचना, अवैध वाहतूक होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना शाळा महाविद्यालय परिसरातील दुकाने, टपरीची नियमित तपासणी करणे, शाळा, महाविद्यालय गेट बाहेर संशयास्पद ठिकाणाच्या अनुषंगाने सीसीटीव्ही कॅमरे बसविण्याच्या सूचना जिल्हा रुग्णालयात व्यसनमुक्ती कक्ष स्थापन करावा, व्यसनमुक्ती केंद्र खाजगी दवाखान्यात किती पेशन्ट उपचार घेत आहेत. किती रुग्णांवर उपचार करण्यात आलेत, त्यांना कुठल्या प्रकारचे व्यसन जडले होते. अंमली पदार्थांची उपलब्धता कुठून केली होती. याबाबतीत आरोग्य विभागाने माहिती संकलित करून पोलीस प्रशासनाला द्यावी. कृषी, वन विभागानं जिल्ह्यातील ग्रामीण /दुर्गम भागात खसखस किंवा गांजा पिकांची अवैध लागवड होणार नाही, याची खरबदारी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. 


इतर महत्वाची बातमी : 


Sasoon Hospital Drug Racket : ससूनच्या डॉक्टरांची चौकशी करा, दोषी आढळल्यास थेट कारवाई करा; अंबादास दानवेंची मागणी