नाशिक : नाशिककरांसाठी (Nashik) अतिशय महत्वाची बातमी असून आज दिवसभर पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे मनपाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे नाशिककरांनी आणि आणि उद्याच्या पाण्याचे नियोजन करून ठेवणे क्रमप्राप्त ठरणार आहे. आज संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा (Water Supply) सकाळी नऊ ते पाच वाजेपर्यंत बंद असणार आहे, तर उद्या रविवारी देखील कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती मनपा (nashik NMC) प्रशासनाकडून देण्यात आली आहे. 


नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण (Gangapur Dam) 95 टक्के भरले असून नाशिककरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. मात्र आज काही दुरुस्तीच्या कामामुळे संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुकणे व गंगापूर धरणावरील पंपिंग स्टेशनच्या दुरुस्तीची कामे हाती घेतली जाणार असल्याने आज शनिवारी संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा दिवसभर (Water Supply Closed) बंद ठेवला जाणार आहे. गंगापूर धरण तसेच मुकणे धरणावर आहे. मुकणे रॉ वॉटर पंपिंग स्टेशन येथे महावितरणच्या सबस्टेशनमधील दुरुस्ती कामे तसेच 33 केव्ही क्षमतेच्या उपकरणांची तपासणी केली जाणार आहे. 


गंगापूर धरण रॉ वॉटर पंपिंग स्टेशन येथील मिटरिंग येथील क्युबिकलचे नवीन आवश्यक दुरुस्ती कामे तातडीने करणे आवश्यक आहे. यासाठी महावितरण कंपनीकडील वीजपुरवठा शनिवारी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजता बंद ठेवावा लागणार असल्याने शनिवारी गंगापूर धरण रॉ वॉटर पंपिंग स्टेशन संपूर्ण नाशिक शहरातील पाणीपुरवठा  होणार नाही. तर उद्या रविवारी सकाळी देखील कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. शनिवारी पाणीपुरवठा बंद राहणार असून दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळचा पाणीपुरवठा कमी प्रमाणात, कमी दाबाने होईल, असे महापालिकेतर्फे कळविण्यात आले आहे. त्यामुळे नाशिककरांनी मनपास सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 


गंगापूर धरण 95 टक्क्यांवर 


दरम्यान पावसाने ओढ (Nashik Rain) दिली असली तरीही गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची हलक्या सारी कोसळत आहेत. तसेच मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे गंगापूर धरण साठ्यात चांगली वाढ झाली आहे. त्यामुळे यंदा नाशिककरांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार नसल्याचे चित्र आहे. नाशिकला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात सद्यस्थितीत 95 टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे नाशिककरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे.   आंतर आज दुरुस्तीच्या कामांमुळे शहरात पाणी पुरवठा बंद राहणार असल्याने पाणी जपून वापरण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे. 
 
इतर महत्वाची बातमी : 


Nashik Rain : नाशिक जिल्ह्यातील 213 गावांना सर्वाधिक 81 टँकरद्वारे पाणीपुरवठा, भर पावसाळ्यात टँकरवर तहान भागवण्याची वेळ