Nashik : शिवसेना नेते उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांच्या दुष्काळी दौऱ्यानंतर आज आदित्य ठाकरे (Aditya Thakeray) हे दोन दिवशीय दुष्काळी दौऱ्यावर आहेत. कालच त्यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दुष्काळी दौरा करत शेतकऱ्यांशी संवाद साधला तर आज नाशिक जिल्ह्याच्या दुष्काळी भागात जाऊन ते पाहणी करणार आहेत. यात निफाडसह सिन्नर, इगतपुरी (Igatpuri) तालुक्यात जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. 


एकीकडे यंदा पावसाने मोठी ओढ दिल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. मागील आठवड्यात झालेल्या पावसांनंतर पुन्हा पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे हाती येणारी पिकेही जळू लागली आहेत. अनेक भागातील पिकांना मोठा फटका बसला असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. अशातच अहमदनगर जिल्ह्याच्या दुष्काळी दौऱ्यावर उद्धव ठाकरे येऊन गेले. त्यांनी देखील शेतकऱ्यांच्या बांधावर जात पावसाअभावी नुकसान होत असलेल्या पिकांची पाहणी केली त्यानंतर लागलीच युवा सेनेचे आदित्य ठाकरे हे देखील मैदानात उतरले असून दोन दिवसांच्या दुष्काळी दौऱ्यात त्यांनी काल दिवसभर संभाजीनगर जिल्ह्यात पाहणी केली. त्यानंतर आज ते नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सिन्नर (Sinner), निफाड, इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करणार आहेत. 


नाशिक (Nashik District) जिल्ह्यात यंदा पाऊस खूपच कमी प्रमाणात झाल्याने जुलैपासूनच दुष्काळी स्थिती (Nashik Drought) निर्माण झाली आहे. त्यानंतर थेट सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पावसाने हजेरी लावली. मात्र दोन दिवस पाऊस झाला. त्यामुळे सद्यस्थितीत खरीप पिके वाया जाण्याची भीती असून अजूनही शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. निम्मा सप्टेंबरही (Nashik Rain) संपला मात्र अजूनही पावसाने फारशी आभाळमाया केली नसल्याने अनेक भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई देखील निर्माण झाल्याचे चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर आज आदित्य ठाकरे नाशिक जिल्ह्यात दौरा करत यामध्ये ते सिन्नर, निफाड, इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. यावेळी ते प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांची परिस्थिती समजून घेणार आहेत. 


असा असेल नाशिक दौरा


आदित्य ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा दौरा केल्यानंतर आज दुसऱ्या दिवशी नाशिक जिल्ह्यात ते फिरणार आहेत. यात प्रामुख्याने तीन जिल्ह्यामध्ये ते जाणार आहेत. निफाड तालुक्यातील भेंडाळी गावातील नुकसानग्रस्त भागाची 11.30 वाजता पाहणी करतील. त्यानंतर सिन्नर तालुक्यातील वंडागळी 12.30 वाजता नुकसानग्रस्त भागाची पाहणी करतील. त्यानंतर इगतपुरी तालुक्यातील साकुर गावात नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधतील. त्यानंतर मुंबईकडे रवाना होणार आहेत. 


 
इतर महत्वाची बातमी : 


धीर सोडू नका, आम्ही आहोत तुमच्यासोबत, आता सरकारच्या मागे लागू; आदित्य ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर