नाशिक : गणेशोत्सव (Ganeshotsav) काही दिवसांवर येऊन ठेपला असून या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांकडून (Nashik Police) शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. गणेशोत्सवानिमित्त वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून शहरातील मध्यवर्ती ठिकाणी मध्यवर्ती ठिकाणी वाहनांना मज्जाव करण्यात आला आहे. त्यामुळे नाशिककरांनी पुढील दहा-बारा दिवस पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
नाशिक (Nashik) शहरातील येत्या मंगळवारपासून सुरू होत आहे. गणेशोत्सव म्हटला की नाशिककरांनी मोठी गर्दी शहरात पाहायला मिळते. अशावेळी वाहतूक कोडींची (Traffic) मोठी समस्या उद्भवते. गणेशोत्सवात नागरिकांची गर्दी लक्षात घेता पोलिस प्रशासनाने वाहतुकीचे नियोजन केले असून जादा गर्दी होणारी मंडळे तसेच शहरातील प्रमुख बाजारपेठेत होणारी गर्दी लक्षात घेता अनेक भागांतील वाहतूक वळवण्यात आली आहे. तसेच अनेकजण पाचव्या व सातव्या दिवशी विसर्जन करत असतात, या दिवशी देखील वाहतूक कोंडी (Traffic Route Change) होण्याची शक्यता लक्षात घेऊन नियोजन करण्यात आले आहे.
शालिमारकडील वाहतूक वळवणार
नाशिक शहरातील मोडक सर्कल ते खडकाळी सिग्नलकडून कालिदास कलामंदिर मार्गे सुमंगल दुकानमार्गे शालीमारकडे जाणारी वाहतूक दहा दिवस बंद राहील राहील. मात्र, मोडक सिग्नल व खडकाळी सिग्नल येथून किटकॅट चौफुलीकडे येणारी व कालिदास कला मंदिर मार्गे जाणाच्या या वाहतुकीसाठी सारडा सर्कल, गडकरी चौक मोडक सिग्नलकडून सीबीएस सिग्नल याद्वारे जाऊ आणि येऊ शकेल. तसेच सीबीएसकडून गायकवाड क्लासेस, कान्हेरेवाडी मार्गे किटकॅट, सुमंगल कपड्याचे दुकान व कालिदास मार्ग व किटकॅटकडून सीबीएसकडे ये-जा करणारी वाहतूक दोन्ही बाजूने बंद राहील. पंचवटीत सरदार चौक ते काळाराम मंदिरपर्यंतचा रस्ता दोन्ही बाजूने सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद असेल तसेच पंचवटीतच मालवीय चौक ते श्री काळाराम मंदिरपर्यंतचा रस्ता दोन्ही बाजूने बंद राहील. त्यामुळे नागरिकांना उत्सव कालावधीत या मार्गाचा वापर करता येणार नाही.
शहरातील मध्यवर्ती भागातही नो एन्ट्री
तसेच गणेशोत्सव काळात शहरातील मध्यवर्ती ठिकाणांवर वाहतूक नियोजन करण्यात आले आहे. यासाठी सारडा सर्कल ते खडकाळी सिग्नल, शालीमार मार्गे सीबीएसकडे ये-जा करणाऱ्यांना प्रवेश बंद राहील. तसेच खडकाळी सिग्नल येथून दीप सन्स कॉर्नर, नेहरू गार्डनकडून गाडगे महाराज पुतळा मार्गे मेनरोड, बादशाही कॉर्नरकडे जाणाऱ्या वाहनांना बंदी असेल. तसेच त्र्यंबक पोलिस चौकी ते बादशाही कॉर्नर या मार्गावर तसेच गाडगे महाराज पुतळा, धुमाळ पॉईंट, ते मंगेश मिठाई तसेच सीबीएस सिग्नलपासून शालीमार ते नेहरू गार्डन आणि मेहेरकडून सांगली बँक सिग्नल, धुमाळ पॉईंट, दहीपुलाकडे वाहनांना प्रवेश बंद राहील. त्याचप्रमाणे प्रतिक लॉजकडून नेपाळी कॉर्नरकडे जाणारी वाहने, अशोक स्तंभ येथून रविवार कारंजा मालेगाव स्टैंडकडे जाण्यास मनाई असेल.
पाचव्या व सातव्या दिवसाचे नियोजन
निमाणी बसस्थानक येथून शालीमार मार्गे नाशिकरोडकडे जाणाऱ्या एसटी आणि सिटी लिंकच्या बसेस तसेच सर्व प्रकारची वाहतूक रविवार कारंजा- सांगली बँक सिग्नल कॉर्नरपर्यंत आल्यानंतर तेथून सारडा सर्कलपर्यंतचा मार्ग 19 ते 24 सप्टेंबरदरम्यान रोज सायंकाळी 6 ते रात्री बारा वाजेपर्यंत बंद राहील. त्याऐवजी या मार्गावरील वाहतूक निमाणी बसस्थानक येथून मालेगाव स्टैंड, रामवाडी, चोपडा लॉन्स, जुना गंगापूर नाका, शरणपूर रोड सिग्नल, मोडक सिग्नल, गडकरी चौक सिग्नल, सारडा सर्कल मार्गे नाशिकरोडला जातील. नाशिकरोडकडून शालीमार मार्गे सीबीएसपर्यंतचा मार्ग शहरी बस आणि अन्य वाहतुकीना 23 ते 28 सप्टेंबरदरम्यान सायंकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत बंद राहील. मात्र, नाशिकरोडकडून या मार्गाकडे येणारी वाहतूक सारडा सर्कलपर्यंत आल्यानंतर तेथून गडकरी चौक, मोडक सिग्नल, अशोकस्तंभ, रामवाडी, मखमलाबाद नाका, पेठफाटा मार्गे निमाणीत जाईल. अशोकस्तंभ ते रविवार कारंजा दरम्यानची वाहतूक दोन्ही प्रकारचा मार्ग 23 ते 28 सप्टेंबरदरम्यान सायंकाळी 6 ते रात्री 12 वाजेच्या वेळात नो पार्किंग झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.
इतर महत्वाची बातमी :