नाशिक : अबालवृद्धांचे लाडके दैवत असणाऱ्या विघ्नहर्त्याच्या (Ganesh Chaturthi) स्वागतासाठी नाशिकनगरी (Nashik) सज्ज झाली असून आज सकाळपासूनच ढोलताशा, गुलालाची उधळण, टाळ्यांचा नाद आणि मोरया... मोरयाच्या (Ganpati Bappa Morya) गजरात उत्साही वातावरणात श्री गणेशाचे आगमन होत आहे. शहरात बाप्पाच्या आगमनासाठी मोठा उत्साह असून सर्वत्र ढोल ताशांसह गजरात बाप्पाचं आगमन होत आहे. वर्षभरापासून भाविकांना प्रतीक्षा असलेला लाडक्या गणरायाचे आज घरोघरी वाजत गाजत आगमन होत असून गणेश भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.


राज्यभरात गणरायाच्या (Ganpati Bappa Morya) आगमनाचा उत्साह असून लाडक्या गणरायाचे आज सकाळपासून घरोघरी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात आगमन होत आहे. नाशिक शहरातील बाजारपेठ गत तीन दिवसांपासूनच गर्दीने फुलली असून सोमवारी तर गणरायाच्या आगमनाप्रीत्यर्थ शहरात उत्साहाचे वातावरण होते. तर आज सकाळपासूनच घरोघरी गणपती बाप्पांच्या आगमनाने वातावरणात उत्साह पाहायला मिळत आहे. शहरातील काही छोट्या मोठ्या मंडळांनी त्यांच्या भव्य गणेश मूर्तींना सोमवारी ढोल ताशांच्या (Nashik Dhol) गजरात मंडपात आणले यावेळी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी लेझीमचा नृत्याचा फेर धरत गणरायाचे जोरदार स्वागत केले काही मंडळातील महिला पदाधिकाऱ्यांनी तर फुगडी सहन नृत्याचा आनंद लुटत गणरायाच्या आगमनाचा जल्लोष केला आज सर्व सार्वजनिक मंडळांमध्ये सायंकाळपर्यंत विधिवत प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.


नाशिकसह (Nashik) राज्यातील नागरिकांच्या जीवनावर आलेले जलविग्न दूर करण्यासाठी जणू सुखकर्ता गणरायाच्या आगमन होणार असल्याची भावना जनमानसात आहे. घरोघरी आपापल्या पसंतीनुसार विविध आकाराच्या बाप्पांना (Ganesh Chaturthi 2023)  वाजत गाजत आणले जात असून दुर्वा, फुले, धूप, दीप, पंचारती अशी साग्रसंगीत तयारी पूजेसाठी करण्यात येत आहे. दोन दिवसांपासून पूजा साहित्य खरेदीसाठी बाजारपेठामध्ये गर्दी पाहायला मिळाली. तर आजही खरेदीसाठी शहरातील बाजारपेठांमध्ये नाशिककरांनी गर्दी केली आहे. घरोघरीच्या बाप्पांच्या स्वागताबरोबरच शहरातील ऑफिसेस, दुकाने आदी ठिकाणीही गणपतीची स्थापना करुन प्रत्येकजण  आपापल्या परीने बाप्पांचे जोरदार स्वागत करीत आहे. सर्वत्र उत्साहाचे वातावरण असून गणेश मंडळांचीही सकाळपासूनच धावपळ सुरू आहे. ढोलताशे, बँडपथक, ध्वजपथक, सनई-चौघड्याच्या निनादात रथामध्ये किंवा पालखीमध्ये बसवून गणरायाची मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी नेण्यात येत आहेत. 


गणेश प्रतिष्ठापनेचा मुहूर्त 


तर आज गणेश चतुर्थीनिमित्त गणपती प्राणप्रतिष्ठाची शुभ वेळही मंगळवारी सकाळी 11 वाजून सात मिनिटांनी ते दुपारी एक वाजून 34 मिनिटांनी पर्यंत राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. विधिवत पूजाअर्चा करून गणरायाची स्थापना करण्यात येत आहे. त्यानंतर लाडक्या बाप्पाचा आवडता नैवेद्य म्हणजे उकडीचे मोदक करण्यामध्ये घरातील महिलामंडळ व्यग्र झाले असून काही महिलांनी दुकानांमधून मोदक विकत घेण्यास पसंती दिली आहे. आज सकाळपासुन कुणी गाडीवर. कुणी सायकलवर तर पायी पायीच गणरायाला घरी घेऊन येताना दिसत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Ganesh Chaturthi 2023 : गणेश चतुर्थीची पूर्ण व्रत कथा, पठण केल्याशिवाय उपवास राहील अपूर्ण, जाणून घ्या