Pune Ganeshotsav 2023 : सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते श्रीमंत दगडूशेठ गणपतीची प्रतिष्ठापना
गणपती बाप्पा मोरयाच्या (Pune Ganeshotsav 2023) जयघोषात आणि ढोल ताशांच्या गजरात पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी सकाळी साडेआठ वाजता मुख्य मंदिरापासून श्री हनुमान रथातून श्रींची मिरवणूक निघाली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरितीरिवाजानुसार आणि धर्मपरंपरेनुसार आकर्षक फुलांच्या श्री हनुमानाच्या चार मूर्ती रथावर मिरवणूक काढण्यात आली.
कोतवाली चावडी येथील पारंपारिक जागेत श्रीराम मंदिर अयोध्या मंदिराची प्रतिकृती साकारलेल्या मंदिरात बाप्पा विराजमान झाली
सकाळी 11 वाजून 10 मिनिटांनी सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांच्या हस्ते श्रींची प्रतिष्ठापना झाली.
यामध्ये लहानांपासून थोरांपर्यंत गणेश भक्त उपस्थित होते.
यंदा दगडूशेठ गणपती मंडळाने राम मंदिराचा देखावा साकारला आहे.
याच राम मंदिराच्या भव्य देखाव्यात लाडक्या बाप्पाची मुर्ती विराजमान झाली.
हे सगळं दृष्य टिपण्यासाठी पुणेकरांनी गर्दी केली होती.