नाशिक : गौतमी पाटील(Gautami Patil) आणि वाद हे काही महाराष्ट्राला नवीन नाही. गौतमी पाटीलचा जिथे कार्यक्रम असेल तिथे वाद हे समीकरण झाले आहे. नुकतंच तिचा नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी (Dindori) तालुक्यात गणेशोत्सवानिमित्त कार्यक्रम झाला. हा कार्यक्रम थेट गावातील जिल्हा परिषद शाळेच्या आवारातच भरविल्याचे समोर आले. दरम्यान या प्रकरणी शिक्षण मंत्र्यांकडून दखल घेण्यात आली असून गट शिक्षणाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. 


सबसे कातील गौतमी पाटीलने (Gautami Patil) आपल्या नृत्याने महाराष्ट्राला वेड लावलं आहे. गौतमीच्या नृत्याचा कार्यक्रम म्हटलं की गडबड, गोंधळ हे प्रकार होतातच. नुकतचं नाशिकच्या (Nashik) दिंडोरी तालुक्यातील वलखेड या गावात एका गणेश मंडळाच्या माध्यमातून गौतमी पाटीलचा (Gautami Patil Dance) कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम याच गावातील जिल्हा परिषद शाळेतील (ZP School) आवारात आयोजित करण्यात आला होता. याच शाळेत दिवसा शाळा झाल्यानंतर रात्रीच्या सुमारास गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला गावकऱ्यांसह आजुबाजुंच्या नागरिकांची तोबा गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. यावर आता शिक्षण मंत्र्यांकडून दखल घेण्यात आली असून संबंधितांवर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. 


शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) म्हणाले की, दिंडोरी तालुक्यातील घडलेला प्रकार धक्कादायक असून त्याची चौकशी केली जाईल आणि संबंधितांवर कारवाई सुद्धा केली जाईल. झेडपी शाळेत अशा कार्यक्रमांना परवानगी नसून सांस्कृतिक कार्यक्रम होऊ शकतात, मात्र सांस्कृतिक कार्यक्रम कोणते असावेत, याचं भान बाळगणं महत्त्वाचं आहे. मात्र असा काही कार्यक्रम झाला असल्यास हे धक्कादायक असल्याचं शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितल आहे. तर स्थानिक गटशिक्षण अधिकारी यांनी चौकशी सुरु केली असून बीडीओच्या माध्यमातून चौकशी केली जात आहे. संबंधित चौकशीचा अहवाल पुढे पाठविण्यात येऊन संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे सांगण्यात आले आहे. 



गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल 



अहमदनगर शहरातील पाईपलाईन रोडवर काल सायंकाळी मृत्युंजय प्रतिष्ठान गुलमोहर रोड आणि एकदंत मित्र मंडळ यांच्यावतीने गौतमी पाटील नृत्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यावेळी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमास प्रशासनाने परवानगी नाकारली होती. मात्र, तरीही हा कार्यक्रम घेण्यात आला. मोठ्या संख्येने तरुणांची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळाली. मात्र ऐन रहदारीत कार्यक्रमाचा मंडप असल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला. त्याचबरोबर कार्यक्रमाला परवानगी नसताना देखील कार्यक्रम झाल्याने संबंधित गणपती मंडळाच्या अध्यक्षांसह गौतमी पाटील आणि तिच्या मॅनेजरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यामुळे अहमदनगरमधील कार्यक्रम गौतमी पाटीलच्या चांगलाच अंगलट आला आहे. 



इतर महत्वाची बातमी : 


Gautami Patil : गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल, तोफखाना पोलिसांचा आक्रमक पवित्रा