Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...


Aata Hou De Dhingana: भन्नाट टास्क आणि कलाकारांची मजा मस्ती; ‘आता होऊ दे धिंगाणा’चं दुसरं पर्व येणार प्रेक्षकांच्या भेटीस


Aata Hou De Dhingana: छोट्या पडद्यावरील आता होऊ दे धिंगाणा या लोकप्रिय कार्यक्रमाचं दुसरं पर्व 21 ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. सर्वांचा लाडका होस्ट आणि दोस्त सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुन्हा एकदा धिंगाणा घालण्यासाठी सज्ज झाला आहे. आता होऊ दे धिंगाणा (Aata Hou De Dhingana) या  कार्यक्रमाच्या मागच्या पर्वात सुपरहिट ठरलेल्या साडे माडे शिंतोडे, बोबडी वळाली, धुऊन टाक, रेखाटा पटा पटा या फेऱ्या या पर्वातही असणार आहेत. दोन मालिकांच्या टीममधली सांगितीक लढत प्रेक्षकांसाठी पर्वणी असेलच पण त्यासोबतच भन्नाट टास्क आणि कलाकारांच्या पडद्यामागच्या गमती-जमतीही या मंचावर उलगडतील.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Gautami Patil : सबसे कातील गौतमी पाटील रुपेरी पडदा गाजवण्यासाठी सज्ज! 'घुंगरू' पुढच्या महिन्यात येणार प्रेक्षकांच्या भेटीला


Gautami Patil Movie : सबसे कातील गौतमी पाटीलने (Gautami Patil) आपल्या नृत्याने महाराष्ट्राला वेड लावलं आहे. आता नृत्यांगना रुपेरी पडदा गाजवण्यासाठी सज्ज आहे. गौतमीचा 'घुंगरू एक संघर्ष' (Ghungaroo Ek Sangarsha) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Shreyas Talpade: दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाला गेला अन् रस्ता चुकला, मग या व्यक्तीनं केली मदत, श्रेयस तळपदेनं सांगितला अनुभव, म्हणाला, "धन्यवाद साहेब"


Shreyas Talpade: अभिनेता  श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) हा सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करतो. नुकतीच श्रेयसनं सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून श्रेयसनं बाप्पाच्या दर्शनाला जाताना आलेल्या अनुभवाबद्दल सांगितलं आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Dev Anand Birth Anniversary: "आज ते असते तर..." देव आनंद यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त हेमांगी कवीची खास पोस्ट


Dev Anand Birth Anniversary:  अभिनेते  देव आनंद (Dev Anand) यांची आज 100 वी जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे चाहते सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आहेत. नुकतीच अभिनेत्री  हेमांगी कवी (Hemangi Kavi) हिने देखील एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून हेमांगीनं तिचं देवा आनंद यांचे आवडते गाणे सांगितले आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक


Vanita Kharat: "साडीप्रेम वाढत चाललंय"; वनिता खरातनं शेअर केले खास फोटो