नाशिक : नाशिक जिल्ह्यात (Nashik) धक्कादायक घटना उघडकीस आली असून दारू पिऊन सततचा त्रास देणाऱ्या सुपारी देऊन जन्मदात्या बापानेच संपवल्याचे समोर आले आहे. जन्मदात्या बापानेच इतर दोघांना 70 हजार रुपयांची सुपारी दिली. या दोघांनी मिळून त्याचा खून केल्याचा प्रकार सिन्नरमध्ये (Sinner) उघडकीस आला आहे. या तिघांनाही सिन्नर पोलिसांनी (Sinner Police) अटक केली असून या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
नाशिक (Nashik district) जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पास्ते गावात ही घटना घडली आहे. राहुल शिवाजी आव्हाड (Youth Murder) असे मृत मुलाचे नाव आहे. बुधवारी दुपारच्या सुमारास पास्ते ते हरसुले रस्त्यावर बंद पडलेल्या कालिया कंपनीच्या आवारातील मीटर रूममध्ये राहुलचा मृतदेह आढळून आला. परिसरातील स्थानिक रहिवासी शंकर कातकाडे यांनी तात्काळ पोलीस पाटलांना याबाबत माहिती दिली. सिन्नर पोलिसांना याबाबत कळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी राहुलच्या तोंडातून फेस निघत होता. नागरिकांच्या मदतीने राहुलला तात्काळ सिन्नर ग्रामीण रुग्णालयात (Sinner Hospital) दाखल करण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंदही करण्यात आली होती. मात्र पोलिसांच्या तपासांनंतर त्याचा खून झाल्याचे समोर आले.
असा झाला खुनाचा उलगडा
या प्रकरणानंतर पोलीस तपासाला सुरवात केली. यासाठी पोलिसांकडून राहुलच्या कुटुंबातील सदस्यांना व ग्रामस्थांकडे राहुलबाबत चौकशी केली. यावेळी पोलिसांना राहुल हा दारू पिण्याच्या आहारी गेला होता. तो आपल्या आई-वडिलांना त्रास देत असल्याचे पोलीस तपासात समोर आले. आई-वडिलांना मारहाण करण्यासोबतच तो गावातील नागरिकांही त्रास देत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांचा संशय कुटुंबातील सदस्यांवर बळावला. यासाठी राहुलचे वडील शिवाजी विश्वनाथ आव्हाड यांनी कसून चौकशी केली असता त्यांनी आपल्या मुलाला मारण्यासाठी गावातील वसंत अंबादास आव्हाड व विकास उर्फ बबलू शिवाजी कुटे या दोघांना 70 हजार रुपये देण्याचे कबूल करत सुपारी दिली.
खुनासाठी 70 हजार रुपयांची सुपारी
दरम्यान पोलीस तपासात धक्कादायक बाब समोर आली. जन्मदात्या पित्यानेच आपला पोटाचा गोळा संपवण्यासाठी गावातील दोघांना 70 हजार रुपयांची सुपारी दिली. यात संशयित दोघांसह बापानेही सहभाग हत्येचा कट रचला. त्यानंतर वसंत व विकास या दोघांनी रात्रीच्यावेळी राहुलला एकांतात गाठत त्यास हरसूले रस्त्यावरील बंद पडलेल्या कंपनीत घेऊन गेले. तेथे त्यांनी राहुलचा गळा दाबून त्याचा खून केला. राहुलने स्वतःच विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली असे वाटावे, म्हणून दोघांनी त्याच्या तोंडात विषारी औषध टाकून त्यास कंपनीतील मीटर रूममध्ये टाकून दिल्याचे दोघांनी पोलिसांना सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी राहुलचे वडील शिवाजी आव्हाड, वसंत आव्हाड व विकास कुटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
इतर महत्वाची बातमी :