नाशिक : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील 48 ग्रामपंचायतीसाठी मतदान (Grampanchayat Election) प्रक्रिया पार पडत असून अशातच इगतपुरी तालुक्यात निवडणुकीदरम्यान राडा पाहायला मिळाला आहे. इगतपुरी (Igatpuri) तालुक्यातील धारगाव ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान तुंबळ हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात (Ghoti Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक (Nashik District) जिल्ह्यातील 48 ग्रामपंचायतीसाठी आज सकाळी मतदान प्रक्रियेला सुरवात झाली असून अर्ज माघारीनंतर प्रत्यक्षरित्या 43 ग्रामपंचायतींमधील सदस्य पदांच्या 200 जागांसाठी तसेच 44 ठिकाणी थेट सरपंच पदासाठी लढत आहे. या दरम्यान ईगतपुरी तालुक्यातील धारगाव ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान राडा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. रात्री उशिरा धारगाव ग्रामपंचायतच्या दोन महिला उमेदवार सदस्यांचे पती आणि समर्थकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली आहे. या प्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून धारगावमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता असून चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
इगतपुरी तालुक्यातील 15 गावातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. माघारीच्या दिवशी अनेक पुढाऱ्यांनी उमेदवारांची मनधरणी करत विनवणी करत निवडणुक बिनविरोध करण्यासाठी माघार घेण्याची विनंती केली. मात्र उमेदवार ऐकण्याच्या मनःस्थितीत नसल्याचे दिसुन आल्याने पुढाऱ्यांचे अस्तित्व धोक्यात आल्याचे दिसुन आले आहे. तर याच तालुक्यातील धारगांव येथील 9 जागांपैकी 7 जागा बिनविरोध झाल्या असुन 2 उमेदवार निवडणुक लढवीत आहेत. याच गावात रात्री उशिरा तुंबळ हाणामारीची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. सध्या गावात शांतता पोलिसांच्या उपस्थितीत मतदान सुरु आहे.
नाशिक जिल्ह्यातील ग्रामपंचायतीसाठी आज मतदान
नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) 43 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक तसेच 15 ग्रामपंचायतींमधील सरपंच व सदस्यांच्या 18 रिक्त जागांसाठीच्या प्रचाराचा धुराळा शुक्रवारी सायंकाळी थंडावला. यासर्व ठिकाणी रविवारी मतदान होत असून मतदान केंद्र अधिकारी व कर्मचारी हे साहित्यासह शनिवारी मतदान केंद्रांकडे रवाना होतील. जिल्ह्यामध्ये 48 ग्रामपंचायतींमध्ये (Grampanchayat) सार्वत्रिक निवडणूकांचा कार्यक्रम सुरू आहे. अर्ज माघारीनंतर प्रत्यक्षरित्या 43 ग्रामपंचायतींमधील सदस्य पदांच्या 200 जागांसाठी तसेच 44 ठिकाणी थेट सरपंच पदासाठी लढत आहे. याव्यतिरिक्त 16 ग्रामपंचायतींमधील सदस्यांसाठीच्या 15 तसेच सरपंचाच्या तीन अशा एकुण 18 जागांकरीता पोटनिवडणूका होत आहेत. यासर्व ठिकाणी रविवारी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच यावेळेत मतदान पार पडणार आहे.
इतर महत्वाची बातमी :