नाशिक : उद्या राज्यातील असंख्य ग्रामपंचायतीमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. नाशिक जिल्ह्यात (Nashik district) देखील निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे. जिल्ह्यातील 48 ग्रामपंचायतीसाठी उद्या मतदान होणार असून अर्ज माघारीनंतर प्रत्यक्षरित्या 43 ग्रामपंचायतींमधील सदस्य पदांच्या 200 जागांसाठी तसेच 44 ठिकाणी थेट सरपंच पदासाठी लढत आहे.


नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) 43 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक तसेच 15 ग्रामपंचायतींमधील सरपंच व सदस्यांच्या 18 रिक्त जागांसाठीच्या प्रचाराचा धुराळा शुक्रवारी सायंकाळी थंडावला. यासर्व ठिकाणी रविवारी मतदान होत असून मतदान केंद्र अधिकारी व कर्मचारी हे साहित्यासह शनिवारी मतदान केंद्रांकडे रवाना होतील. जिल्ह्यामध्ये 48 ग्रामपंचायतींमध्ये (Grampanchayat) सार्वत्रिक निवडणूकांचा कार्यक्रम सुरू आहे. अर्ज माघारीनंतर प्रत्यक्षरित्या 43 ग्रामपंचायतींमधील सदस्य पदांच्या 200 जागांसाठी तसेच 44 ठिकाणी थेट सरपंच पदासाठी लढत आहे. याव्यतिरिक्त 16 ग्रामपंचायतींमधील सदस्यांसाठीच्या 15 तसेच सरपंचाच्या तीन अशा एकुण 18 जागांकरीता पोटनिवडणूका होत आहेत. यासर्व ठिकाणी रविवारी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच यावेळेत मतदान पार पडणार आहे.


दरम्यान ग्रामपंचायत निवडणूक मतदानाच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने तयारी पुर्ण केली आहे. सार्वत्रिक निवडणूका होत असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये एकुण 43 तर पोटनिवडणूकांसाठी सुमारे 25 च्या आसपास मतदान केंद्र अंतिम करण्यात आले आहेत. तसेच मतदानासाठीचे ईव्हीएम व अन्य साहित्य घेऊन अधिकारी व कर्मचारी हे आज मतदान केंद्राकडे रवाना झाले आहेत. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणूकीची रंगीत तालिम म्हणून या निवडणूकांकडे पाहिले जात आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी निवडणूकीवर लक्ष केंद्रीत केले आहे. गावपातळीवर आठवड्याभरापासून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्याने एकुणच वातावरण ढवळून निघाले आहे. त्यामुळे मतदार कोणाला कौल देणार हे सोमवारी स्पष्ट होणार आहे. 


184 सदस्य बिनविरोध, तर 128 ठिकाणी एकही उमेदवारी अर्ज नाही! 


नाशिक जिल्ह्यात 48 ग्रामपंचायतींमधील सदस्यांच्या 416 जागांसाठी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. पण माघारीनंतर 184 सदस्य हे बिनविरोध निवडून आले असून 32 ठिकाणी एकही अर्ज प्राप्त झाला नाही. तसेच ३ ठिकाणी सरपंच बिनविरोध ठरले असून 44 ग्रामपंचायतींत सरपंचाच्या जागांसाठी मतदान होईल. तर पोटनिवडणूकांमध्ये 145 ग्रामपंचायतींमध्ये सदस्यांच्या रिक्त जागांकरिता 128 ठिकाणी एकही ऊमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. तर 49 सदस्य बिनविरोध आले आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात 16 जागांसाठी मतदान होणार आहे. सरपंचांच्या चार जागांमधून एक बिनविरोध आला असून तीन ठिकाणी निवडणूक होत आहेत.


इतर महत्वाची बातमी : 


Gram Panchayat Elections : रविवारी 2,359 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा धुरळा उडणार, बीडमध्ये 186 ग्रामपंचायतींसाठी मतदान, प्रशासनानेही कसली कंबर