नाशिक : आजकाल कब्बडी (Kabbadi) म्हटलं अनेकजण या खेळाबाबत फारसं कौतुक करताना दिसत नाही. आजही हा खेळ म्हटला की ग्रामीण भागातील तरुण तरुणीची संख्या अधिक पाहायला मिळते. ग्रामीण भागातील आणि रांगड्या मातीतल्या या खेळातून जगभरात जाऊन देशाचे प्रतिनिधित्व करता येतं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे नाशिकच्या आडगाव (Adgaon) येथील आकाश शिंदे होय. वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी आकाशने प्रो कब्बडीच्या आठव्या हंगामात आपला खेळ दाखवला. आता याच आकाशची थेट चीन मधील हेंगझोऊ येथील एशियन गेम्स मधील कब्बडीच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी (Asian Games 2023) भारतीय संघामध्ये निवड झाल्याने कौतुकाचा वर्षाव होतो आहे. 


नाशिक (Nashik) शहरापासून अवघ्या काही अंतरावर आडगाव हे दोन हजार लोकवस्तीचे गावं. मात्र शेतीबरोबच इथलं कब्बडी प्रेम वाखाणण्याजोगे आहे. आडगावात कब्बडीची अनेक वर्षांची परंपरा आहे आणि ती आजही जपली जाते. गावातील जवळच असलेल्या शाळा परिसरात फेरफटका मारल्यास दररोज कित्येक जण कबड्डीचा सराव करताना दिसतात. कबड्डी खेळाच्या माध्यमातून अनेक खेळाडू या ठिकाणी तयार झालेले आहेत. त्यामुळे आकाशचे वडील कबड्डीचे खेळाडू असल्याने घरात आपोआप कब्बडीचे वातावरण तयार झाले आहोत.


आकाशाला बालपणापासूनच कबड्डी या खेळाची आवड निर्माण झाली. शालेय जीवनापासूनच तो कबड्डी खेळाकडे आकर्षित झाला. आपल्या मेहनतीच्या जोरावर त्याने अवघ्या विसाव्या वर्षी प्रो कब्बडीत 'पुणेरी पलटन' या संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. या संधीचे सोने करत खेळलेल्या आकाशला आता एशियन गेम्समध्ये भारतीय संघाकडून खेळणार आहे. खूप कमी वयात म्हणजे वयाच्या 22 व्या वर्षी या अंतरराष्ट्रीय स्पर्धेत आकाशची निवड झाल्याने आडगाव पंचक्रोशीत कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.


आडगाव येथील ब्रम्हा स्पोर्टस क्लबच्या माध्यमातून आकाशच्या कबड्डी खेळाच्या प्रवासाला सुरुवात झाली. यानंतर आकाशने (Akash Shinde) कधीही मागे वळून पहिले नाही, एक एक पायरी चढत यशाची अनेक शिखरे त्याने पदक्रांत केली. सुरवातीला नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने खेळविल्या जाणाऱ्या किशोर गट निवड चाचणी स्पर्धेत त्याने जिल्ह्याचे अजिंक्यपद पटकावले.


प्रथमतः त्याची नाशिक जिल्ह्याच्या संघातून महाराष्ट्र राज्य किशोरगटाचे निवड चाचणी स्पर्धेत निवड झाली. 2018-19  मध्ये सिन्नर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य वरिष्ठ गट निवड चाचणी स्पर्धेसाठी नाशिक जिल्हा संघाचे प्रशिक्षक असलेले शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते सागर बांदेकर यांनी आकाशचे खेळातील कौशल्य बघून महिंद्रा आणि महिंद्रा या व्यवसायिक संघात त्याची निवड केली. 2021  जुनिअर नॅशनल रोहतक येथे झालेल्या स्पर्धे मध्ये आकाशचा खेळ बघून युवा पलटण या संघाकडून खेळण्याची संधी दिली. याच संधीचे सोने करून आकाश पुणेरी पलटण या संघाकडून प्रो कबड्डी सीजन 8 मध्ये पदार्पण झाले. 


नाशिकमधील आकाश शिंदे पहिला पुरुष कबड्डीपटू


स्वत: ची ध्येये निश्चित करा, खेळात करिअर करता येते, आवड व क्षमता निर्माण करा, प्रचंड मेहनत करायला शिका, यश तुमच्या जवळ नक्की येईल असा सल्ला आकाशचे वडील सर्व खेळाडूना देतात. आशियाई क्रीडा स्पर्धा सुरू झाल्या असून त्यात भारतातर्फे आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत खेळणारा नाशिकमधील आकाश शिंदे हा पहिला पुरुष कबड्डीपटू असेल. यापूर्वी नाशिकचा एकही पुरुष खेळाडू भारताच्या संघाकडून खेळलेला संधी नाही. येत्या 7 ऑक्टोबरला आकाश आपल्या टीमसोबत मैदानात उतरणार आहे. बालपणापासूनच शाळेच्या मैदानात आपल्या खेळाचा करिष्मा दाखवणाऱ्या आडगावच्या आकाश शिंदेने आवड, क्षमता, सातत्य, संधी व खेळाशी प्रामाणिकपणा यांच्या जोरावर अखेर त्याने भारतीय संघाचे वतीने आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी होऊन गरुडझेप घेतली आहे. या कामगिरीने जनतेच्या मनात कबड्डी खेळाविषयी आदराचे स्थान निर्माण केले असून आकाशच्या यशाने नाशिकचं नव्हे तर महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावलेली आहे. 


ही बातमी वाचा : 


Asian Games 2023 : महाराष्ट्राच्या लेकाची 'सुवर्ण'कामगिरी! 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये अविनाश साबळेची 'गोल्ड'ला गवसणी