Pro Kabaddi League 2019 : चेन्नईच्या जवाहरलाल नेहरु स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या तामीळ थलायवाज आणि पुणेरी पलटण यांच्यातील सामना 31-31 बरोबरीत सुटला. या सामन्यात पुणेरी पलटणच्या सुरजीत सिंहने आपला दहावा हायफाय करत एकूण 7 टॅकल पॉईंट्स मिळवले. तर पुणेरी पलटणकडून पंकज मोहितेला 7 रेड पॉईंट्स मिळाले. तामीळ थलायवाजचा स्टार रेडर राहुल चौधरीने 8 रेड पॉईंट्स मिळवून रण सिंहला 4 टॅकल पॉईंट्स मिळाले.


यंदाच्या मोसमात तामीळ थलायवाज आणि पुणेरी पलटण यांच्यातील हा पहिला टाय सामना होता. या सामन्यानंतर तामीळ थलायवाज संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानावर पोहोचला, तर पुणेरी पलटण संघही बाराव्या स्थानावरुन अकराव्या स्थानावर पोहोचला आहे.

व्हीवो प्रो कबड्डी लीगमध्ये सोमवार (19 ऑगस्ट) चेन्नई लीगच्या तिसऱ्या दिवशी दोन सामने खेळवण्यात येणार आहेत. पहिला सामना हरियाणा स्टीलर्स आणि यू मुम्बा यांच्यात होणार आहे. तर दुसऱ्या सामन्यात जयपूर पिंक पँथर्ससमोर यूपी योद्धाचं आव्हान असेल.