Nashik: 13 वर्षीय 'हृदया'चा अडीचशे किलोमीटरचा प्रवास घोड्यावर
Nashik: नाशिक येथील 13 वर्षीय बालिका हृदया हंडे या बालिकेने घोडेस्वारी करत नाशिक ते सारंगखेडा येणाच्या निर्धार केला होता.
Nashik Latest Marathi News Update: एखाद्या गोष्टीचा निर्धार केला की तो पूर्ण करण्यासाठी जीवाची बाजी लावली जाते. याची प्रचिती नाशिकमध्ये आली आहे. येथील 13 वर्षीय चिमुकलीनं आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी 250 किमीचं अंतर घोड्यावर पार केलेय.
नाशिक येथील 13 वर्षीय बालिका हृदया हंडे या बालिकेने घोडेस्वारी करत नाशिक ते सारंगखेडा येणाच्या निर्धार केला होता. तिनं आपला हा निर्धार पूर्णही केला. 250 किलोमीटर घोडेस्वारीचा प्रवास करत सारंगखेडा येथील चेतक फेस्टीव्हलमध्ये दाखल झाली. येथे तिचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. तसेच परिसरात तिच्या कामगिरीचं कौतुक होत आहे.
हृदया हंडे वय वर्ष अवघे 13 मात्र तिला अश्वसवारी करण्याची मोठी हौस आहे. त्यासाठी तिने अश्वस्वारीचे प्रशिक्षण घेतले आहे. तिने अश्व पंढरी म्हणून ओळख असलेल्या सारंगखेडा येथील चेतक फेस्टिवलला नाशिकहून घोड्यावर स्वार होत येण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय तितका सोपा नव्हता. एक-दोन नव्हे तर तब्बल अडीचशे किलोमीटरचे घोडेस्वारीचे दिव्य तिला पार करायचे होते. त्यासाठी ती 17 डिसेंबर रोजी सारंगखेडासाठी निघाली सोबत तिच्या प्रशिक्षक विशाल आणि वडील होते. मजल दरमजल करत पाच दिवसात हृदया सारंगखेडा येथे दाखल झाले, तिथे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले महिला आणि मुली कुठल्याही क्षेत्रात मागे नसल्याचे सांगत आपला निर्धार पूर्ण करण्यासाठी ही अडीचशे किलोमीटरची घोडेस्वारी केल्याचे ती सांगते.
हृदया हंडे घोडे स्वारी करणारी तेरा वर्षीय बालिका आहे. हृदयाला स्पोर्टची आवड आहे. तिला हॉलीबॉल खेळायचा होता, मात्र मी तिला 600 खेळण्यासाठी प्रोत्साहित केले आणि तिने अश्व क्रीडा खेळण्याचा निर्णय घेतला. हॉर्स रायडर विशाल राजे भोसले यांनी तिला प्रशिक्षण दिलं आणि काही नवीन करण्याच्या ध्येय मनात ठेवून तिने अडीचशे किलोमीटरचे घोडेस्वारी करत चेतक फेस्टिवलला भेट दिली आहे. आवघ्या १३ वर्षीय बालिकेच्या पाच दिवसात अडीचशे किलोमीटरची घोडेस्वारी ही अनेक अश्वप्रेमींना आश्चर्यचकित करणारी बाब असून भविष्यात महाराष्ट्रातही अशोक क्रीडा स्पर्धांमध्ये दर्जेदार खेळाडू निर्माण होतील याची नांदी आहे.
ही बातमी वाचायला विसरु नका :