Nashik Crime News : खुनाच्या गुन्ह्यातील फरार संशयित वाहने अडवून करत होता शिवीगाळ; पोलिसांनी सिनेस्टाईल ठोकल्या बेड्या
Nashik Crime News : एका गॅरेजवर काम करणाऱ्याचा खून केल्याप्रकरणी आठ महिन्यांपासून फरार असलेल्या संशयितास धारदार शस्त्रासह पकडण्यात गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकास यश आले आहे.
Nashik Crime News नाशिक : आडगाव पोलीस ठाणे हद्दीत एका गॅरेजवर काम करणाऱ्याचा खून केल्या प्रकरणी आठ महिन्यांपासून फरार असलेल्या संशयितास धारदार शस्त्रासह पकडण्यात गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकास यश आले आहे. विजय राजेंद्र पाटील (२४, रा. पंचवटी अमरधाम, पंचवटी) असे या संशयिताचे नाव आहे.
नाशिक येथील जनार्दन स्वामी मठाकडून तपोवनकडे येणाऱ्या रस्त्यावर संशयित विजय पाटील हा वाहनांना अडवून शिवीगाळ करीत होता, अशी माहिती शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकचे विशाल काठे यांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रवीण वाघमारे, प्रदीप म्हसदे, नाझीम पठाण, विशाल काठे, प्रशांत मरकड यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
धारदार शस्त्र हस्तगत
पोलिसांना पाहून विजय पाटीलने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याचा सिनेस्टाईल पाठलाग करीत त्याला बेड्या ठोकल्या. पाटीलकडून एक धारदार शस्त्र हस्तगत करण्यात आले आहे.
आडगाव पोलिसांच्या दिले ताब्यात
गेल्या आठ महिन्यापासून आडगावमधील गॅरेजवर काम करणाऱ्याच्या खूनाच्या गुन्ह्यात संशयित फरार होता. आडगाव पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल आहे, संशयित यश कैलास पवार (गोंधळी), प्रसाद रामदास पवार या दोघांना याआधी अटक करण्यात आली आहे. मात्र, मुख्य संशयित विजय पाटील खुनाचा घटनेपासून फरार होता. गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने त्याला अटक केल्यानंतर पुढील तपासासाठी त्याला आडगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा गळा चिरणाऱ्या पतीला 7 वर्ष सक्तमजुरी
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिचा गळा वस्तऱ्याने चिरून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीला सात वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. व्ही. जिवणे यांच्या न्यायालयाने ही शिक्षा ठोठावली. दीपक पवार (रा. समर्थनगर, पंचवटी) असे शिक्षा झालेल्या पतीचे नाव आहे.
पंचवटीतील समर्थनगर येथे ३० जुलै २०२० रोजी हा गुन्हा घडला होता. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पत्नीचा गळा चिरून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन उपनिरीक्षक सुनील कासले यांनी आरोपीच्या विरोधात पुरावे गोळा करत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. न्यायालयाने फिर्यादी, साक्षीदार, पंच यांनी दिलेल्या साक्षी आणि तपासी अधिकारी यांनी सादर केलेल्या पुराव्यास अनुसरून पतीला ७ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.
इतर महत्वाच्या बातम्या