Nashik Crime : एकतर्फी प्रेमातून (One Sided Love) 19 वर्षीय तरुणीचं अपहरण (Kidnap) केल्याची घटना नाशिकमध्ये (Nashik) घडली. मुलीचं अपहरण झाल्याच्या तासाभरातच आई-वडिलांनी रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या (Suicide) केली. या प्रकरणी रविवारी (28 मे) रात्री उशिरा अपहरण करणाऱ्या समाधान झनकरसह त्याच्या साथीदाराविरोधात अपहरण आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


काय आहे प्रकरण?


आरोपी समाधान झनकरचं 19 वर्षीय तरुणीवर एकतर्फी प्रेम होतं. त्यच्याकडून तरुणीकडे लग्नासाठी वारंवार तगादा लावला जात होता. त्यातच रविवारी दुपारी एकच्या सुमारास संबंधित तरुणी आई वडिलांसोबत दुचाकीवरुन प्रवास करत असताना, चारचाकीतून आलेल्या समाधान झनकरने आपल्या साथीदारांसह नाशिकच्या घोटी-पांढुर्ली महामार्गावरुन तिचं अपहरण केलं होतं. तसंच आई-वडिलांना धक्काबुक्कीही करण्यात आली होती. मुलीचं अपहण आणि तरुणाचा लग्नासाठी तगादा, यामुळे कंटाळलेल्या आई वडिलांनी एक तासातच भगूर नानेगाव रेल्वे ट्रॅकवर गोदान एक्स्प्रेसखाली उडी घेत आत्महत्या केली. 


आरोपीविरोधात अपहरण आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा


दरम्यान मुलीच्या मामाने दिलेल्या तक्रारीनुसार सिन्नर पोलीस ठाण्यात रविवारी रात्री उशिरा अपहरण करणाऱ्या समाधान झनकर या तरुणासह त्याच्या साथीदारांवर अपहरण आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपहृत मुलीचा आणि आरोपींचा शोध सध्या पोलिसांकडून घेतला जात असून त्यासाठी रात्रीतूनच पथके रवाना करण्यात आली आहेत. हे प्रकरण संवेदनशील असल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून सर्व बाजूने तपास केला जात आहे.


बहिणीच्या मागे तगादा लावणाऱ्या तरुणाची भावाकडून हत्या


एकतर्फी प्रेमातून बहिणीच्या मागे लग्नाचा तगादा लावणाऱ्या तरुणाची मुलीच्या भावाने हत्या केल्याची घटना नाशिकमध्ये तीन महिन्यांपूर्वी घडली होती. नाशिक जिल्ह्यातील आडगाव परिसरात ही धक्कादायक घटना घडली होती. विकास रमेश नलावडे असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. विकासचे त्याच्याच परिसरातील एका तरुणीवर एकतर्फी प्रेम होतं. त्याला या मुलीसोबत लग्न करायचे होते. त्यामुळे विकासने या तरुणीकडे सतत लग्नासाठी तगादा लावला होता. तर मुलीच्या भावाने विकासला अनेकदा समजावण्याचा प्रयत्न केला होता. तरीही विकास काही ऐकत नव्हता. यामुळे मुलीच्या भावाला या गोष्टीचा राग आला. यातून त्याने विकासची हत्या केली. 


हेही वाचा


Vasai Crime News : एकतर्फी प्रेम करणाऱ्या माथेफिरू तरुणाने तरुणीच्या प्रियकराला खाडीवरून ढकलले; आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक