Nashik Chhagan Bhujbal : दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात (Maharashtra Sadan) स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Sawarkar) यांची जयंती साजरी करण्यात आली. मात्र जयंतीच्या कार्यक्रमासाठी सदनातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (Savitribai Fule) आणि अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे हटविण्यात आले. यावर राजकीय वातावरण तापले असून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. तर छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) या घटनेचा निषेध करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. 


आज नवी दिल्लीमधील (New Delhi) महाराष्ट्र सदन येथे विनायक दामोदर सावरकर (Vinayak Damodar Sawarkar) यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता. ही जयंती साजरी करत असताना महाराष्ट्रात सदनात असलेले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे हटविले. याबाबत निषेध व्यक्त करत छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आज सकाळी नाशिक येथे (Nashik) पत्रकार परिषद घेत या घटनेविषयी त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्र सदनात झालेल्या विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती कार्यक्रमाला आमचा विरोध नाही. मात्र या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र सदनात असलेले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Ahilyadevi Holkar) यांचे पुतळे हटविण्याचे दुष्कृत्य करण्यात आले. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची देखील उपस्थिती होती हे अतिशय दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.


छगन भुजबळ पुढे म्हणाले की, ज्या सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणासाठी शेणगोळे सहन करून मोठा त्याग केला आणि ज्या अहिल्यादेवींनी स्वकर्तृत्वाच्या जोरावर आदर्श राज्यकारभाराचा वस्तुपाठ घालून दिला, त्यांचेच पुतळे या सरकारला सहन होईना. या लोकांच्या बुद्धीची कीव येते अशी टीका केली.  तसेच आमचा सावरकरांच्या कार्यक्रमास विरोध नाही, पण  महापुरुषांचे पुतळे हटवून तुम्ही दाखविलेल्या हीन दर्जाच्या मानसिकतेचं नवल वाटतंय असे सांगत याबाबत निषेध व्यक्त केला आहे. नवी दिल्लीमधील महाराष्ट्र सदन येथे विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता. मुख्य कार्यक्रमाच्यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे मध्ये येऊन म्हणून ते हटवण्यात आले. तेथील बाजूला असलेल्या एका घुमटाकार जागेत ठेवण्यात आले होते. कार्यक्रम झाल्यानंतर हे दोन्ही पुतळे पुन्हा जागेवर ठेवण्यात आली होते.


हेतुपुरस्कर करण्यात आलं का?


सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी पुतळे हटविण्याचे काही गरज नव्हती. याच इमारतीत चांगला ऑडिटोरियम आहे, या ठिकाणी कार्यक्रम करणे गरजेचे होते. मग पुतळे हटविण्याची आवश्यकता का वाटली. महाराष्ट्र सरकारने याबाबत चौकशी केली पाहिजे, हेतुपुरस्कार करण्यात आलले आहे का? का घडलं? कस घडलं ? ज्यांनी कोणी हे केले यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी लक्ष घालून या घटनेची चौकशी करावी... हे असं घडायला नको, असेच गाणं भुजबळ म्हणाले आहेत.