Nashik Railway Mega block : नाशिकरोडमार्गे (Nashik Road Railway Station) जाणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची सूचना असून पुढील दोन नांदगावला मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. भुसावळ-मनमाड विभागातील नांदगाव रेल्वे स्थानकात रिमोल्डिंगच्या कामासाठी मेगाब्लॉक घेण्यात आल्यामुळे 29 आणि 30 मे रोजी नाशिकरोड (Nashik) व नांदगावमार्गे जाणाऱ्या आठ प्रवासी गाड्या रद्द करण्यात आल्या आणि पाच गाड्यांचा मार्ग बदलण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. त्यामुळे रेल्वे प्रवाशांनी या बदलांची नोंद घ्यावी असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 


सध्या सुट्ट्यांचे दिवस सुरु असल्याने पर्यटकांचा प्रवास वाढला आहे. मात्र अशातच नांदगावला (Nandgoan) दोन दिवसांचा मेगाब्लॉक ठेवण्यात आला आहे. भुसावळ (Bhusawal) विभागातील मनमाड (Manmad) ते नांदगाव स्थानकादरम्यान तिसरा रेल्वे मार्ग आणि स्थानकातील इतर कामे दोन दिवस करण्यात येणार असल्याने काही गाड्या दोन दिवस रद्द करण्यात आले आहेत. तर काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. रेल्वे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये 30 मे रोजी भुसावळ इगतपुरी मेमो, इगतपुरी (Igatpuri) भुसावळ पॅसेंजर, देवळाली भुसावळ एक्सप्रेस, भुसावळ पुणे एक्सप्रेस, मुंबई-नागपूर या गाड्यांचा समावेश आहे. 29 मे रोजी रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये भुसावळ देवळाली एक्सप्रेस, पुणे भुसावळ नागपूर मुंबई यांचा समावेश आहे. 


याशिवाय मार्गात बदल करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये 30 मे रोजी नांदेड निजामुद्दीन एक्सप्रेस अकोला भुसावळ कार्ड लाईन मार्गे वळवली जाईल नांदेड अमृतसर सचखंड एक्सप्रेस अकोला भुसावळ कार्ड लाईन मार्गे निघेल. 29 मे रोजी अमृतसर नांदेड सचखंड एक्सप्रेस भुसावळ कार्ड लाईन अकोला मार्गे जाईल. निजामुद्दीन एरणाकुलम मंगला एक्सप्रेस जळगाव पुन्हा वसई रोहा मार्गे जाईल. 28 मे रोजी एरणाकुलम निजामुद्दीन मंगला एक्सप्रेस, एरणाकुलम येथून रोहा वसई, जळगाव मार्गे निघेल. रेल्वे प्रवासी प्रवाशांनी या बदलाची नोंद घ्यावी असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. 


रद्द झालेल्या रेल्वे गाड्यांचा तपशील 


सोमवारच्या दिवशी भुसावळ - देवळाली एक्सप्रेस, पुणे- भुसावळ हुतात्मा एक्स्प्रेस, नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्सप्रेस, तर मंगळवारी इगतपुरी-भुसावळ पॅसेंजर, देवळाली -भुसावळ पॅसेंजर आणि भुसावळ -पुणे हुतात्मा एक्सप्रेस. मंगला एक्स्प्रेस, सचखंड एक्स्प्रेस या गाड्यांचा समावेश आहे.


तर मार्ग बदललेल्या गाड्यामध्ये 28 मे रोजी एर्नाकुलम निजामुद्दीन मंगला एक्सप्रेस रोहा, वसई, उधना, जळगाव मार्गे जाईल. 29 मे रोजी अमृतसर-नांदेड सचखंड एक्सप्रेस भुसावळ अकोला मार्गे जाईल. तर मंगला एक्सप्रेस जळगाव, उधना, वसई, रोहा मार्गे जाईल. तर 30 मे रोजी नांदेड - निजामुद्दीन एक्सप्रेस अकोला भुसावळ मार्गे, सचखंड एक्सप्रेस अकोला- भुसावळ मार्गे धावणार आहे.