नाशिक : गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये गुन्हेगारीच्या (Nashik Crime News) घटनांमध्ये वाढ झाली आहे. आता पुन्हा एकदा पाथर्डी (Pathardi) गावात धक्कादायक घटना घडली आहे. एका युवकावर टोळक्याकडून धारदार शस्त्राने तब्बल 25 वार करत युवकाला ठार मारण्यात आले. यामुळे नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे. 


याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिकच्या पाथर्डी गावात एका युवकाला चार ते पाच जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्राने जवळपास  25 वार करून ठार मारले. रविवारी रात्री ही घटना घडली आहे. नंदेश विजय साळवे (20) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे.


जुन्या भांडणाची कुरापत काढून हल्ला   


इंदिरानगर पोलीस ठाणे (Indiranagar Police Station) हद्दीत पाथर्डी गावात रात्री 11 वाजेच्या सुमारास नंदेश याच्यावर चार ते पाच जणांनी हल्ला केला. जुन्या भांडणाची कुरापतीमधून हा हल्ला झाल्याचे पोलिसांनी (Police) सांगितले आहे. घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलीस घटनास्थळी पोहचले. 


हल्लेखोरांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल


जखमी नंदेश यास जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नंदेश यास तपासून मयत घोषित केले. इंदिरानगर पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहे. दरम्यान, नाशिकमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे अल्पवयीन मुलांचा गुन्ह्यांमध्ये सहभाग वाढत चालला आहे. त्यामुळे शहरातील वाढती गुन्हेगारी रोखणे पोलिसांसमोर (Nashik Police) मोठे आव्हान आहे.  


इतर महत्त्वाच्या बातम्या


धक्कादायक! पुण्यात अल्पवयीन बालकांवर होणाऱ्या अत्याचाराच्या सगळ्या खटल्यांसाठी फक्त एकच न्यायाधीश


तीन शाळकरी मुलांना विहिरीत ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न, नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील खळबळजनक घटना