Nashik Crime News नाशिक : आजवर पोलीस, नगरसेवक, आमदार यांच्या नावे तोतयागिरी करण्याचे प्रकार घडले आहेत. मात्र आता नाशिकमध्ये तर चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांचा स्वीय्य सहाय्यकांच्या नावे तोतयागिरी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात (Bhadrakali Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


"मुख्यमंत्र्यांचा पीए (Chief Minister's personal assistant) कानडे बोलतोय" असे सांगत तोतयाने नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (The Nashik District Central Cooperative Bank) प्रशासकांना (Administrator) फोन केला. सक्तीच्या रजेवर असलेल्या बँकेच्या अधिकाऱ्यांना पुन्हा कामावर घ्या, अशा सूचना तोतयाने प्रशासकांना केल्या आहेत. सक्तीच्या रजेवर असलेल्या अधिकाऱ्याची सध्या चौकशी सुरु आहे आणि त्या अधिकाऱ्याला पुन्हा कामावर रुजू करून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक फोन का करतील? असा प्रश्न त्यांना पडला.


मुख्यमंत्री कार्यालयाकडे संपर्क साधताच प्रकार उघडकीस


त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयाकडे (Chief Minister's Office) संपर्क साधला. मुख्यमंत्री कार्यालयातील (CMO Maharashtra) अधिकाऱ्यांना प्रशासकांनी संपूर्ण आपबिती सांगितली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकांकडून आलेला फोन बनावट (Fake Call) असल्याचे प्रशासकांच्या लक्षात आले. प्रशासकांनी लगेचच जवळचे पोलीस ठाणे (Police Station) गाठले आणि तोतया व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली. याप्रकरणी अज्ञात मोबाईल (Mobile) धारकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस (Police) पुढील तपास करत आहेत.


नाशिकमध्ये ईपीएफओच्या अधिकाऱ्यांना अटक


दरम्यान, नाशिकमध्ये ईपीएफओ (EPFO) विभागीय आयुक्तासह तीन जणांना केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) अधिकाऱ्यांनी दोन लाखांची लाच (Bribe) स्वीकारताना अटक केली. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.  नाशिकमध्ये ईपीएफओ कार्यालय सुरू केल्यानंतर सीबीआयच्या (CBI) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची ईपीएफओवरील ही मोठी कारवाई आहे. 


कर्मचारी भविष्यनिर्वाह निधीचे विभागीय आयुक्त (ग्रेड २) गणेश आरोटे, अंमलबजावणी अधिकारी अजय आहुजा, ईपीएफओ एजंट बी. एस. मंगलकर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तिघांना गुरुवारी नाशिक येथील जिल्हा न्यायालयात (Nashik District Court) हजर करण्यात आले. त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी (Police Custody) सुनावण्यात आली आहे. 


आणखी वाचा 


Nashik Tourism : नववर्षात नाशिकला जाताय? Top 10 ठिकाणांची A टू Z माहिती मिळवा एका क्लिकवर


Supriya Sule : प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीकडून 12 जागा मिळणार?  सुप्रिया सुळे म्हणाल्या....