Baramati : महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षाने 12 जागा लढवाव्यात, असे मत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले होते. यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. "आमची पुढील आठवड्यात बैठक होणार आहे. आम्ही जागावाटपावर सविस्तर चर्चा करु. तुम्हाला आठ ते दहा दिवसांत समजेल कोणाला किती जागा मिळणार" असे सुप्रिया सुळे स्पष्ट केले. बारामती येथील पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. "राम हा आस्थेचा विषय आहे. जगभरात रामाचे भक्त आहेत. मात्र, आम्ही राम कृष्ण हरी वाले आहोत", असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या. राम मंदिराच्या उद्घाटनासाठी आमंत्रण आले तरी जाणार नाही. माझी काही आस्थेची ठिकाणे आहेत, तेथेच मी जातो, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले होते. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनीही राम मंदिराबाबत भाष्य केलय. 


केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी दोन दिवसांपूर्वी शरद पवारांचे कौतुक केले होते. यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, केंद्रिय मंत्री नितीन गडकरी आणि शरद पवार यांचे 40 वर्षांपासून चांगले संबंध आहेत. गडकरी यांच्या मनाचा हा मोठेपणा आहे. 
आमदार बच्चू कडू यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. यावरही सुळे यांनी भाष्य केले आहे. बच्चू कडू यांनी बंद दाराआड चर्चा केली असेल तर मला याबाबत काही माहिती नाही. आम्ही पुढील रणनिती अपात्रेबाबतचा निर्णय आल्यानंतर ठरवणार आहोत, असेही सुळे म्हणाल्या


नाशिक दौऱ्याच्या निमित्ताने शेतकऱ्यांचे दु:ख पीएम मोदींपर्यंत पोहोचेल - सुप्रिया सुळे 


पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक (Nashik) दौऱ्यावर येणार आहेत. पत्रकार परिषदेत बोलताना सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी त्यांचे स्वागत केले आहे. अतिथी देवो भव त्यांचे आम्ही स्वागत करु. नाशिकमध्ये आल्यानंतर शेतकऱ्यांचे दु:ख त्यांच्यापर्यंत पोहोचेल. कांद्या निर्णयाबाबतच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. त्यांनी कांदा निर्यातीबाबत चुकीचा निर्णय घेतला आहे. पीएम मोदींनी कांदा निर्यातीवरिल बंदी उठवावी, अशी मागणीही सुळे यांनी यावेळी केली. शिवाय, शेतकऱ्यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही सुळे यांनी यावेळी दिला. 


आम्ही सभा घ्यायच्या की नाही ? 


आमच्या सभांना परवानगी दिली जात नाही. विरोधी पक्षांच्या सभेला परवानगी दिली जात नाही. त्यामुळे आम्हाला सभा घेताना खूप त्रास होत आहे. या दडपशाही विरोधात आम्ही लढत राहू, अशा इशाराही सुळे यांनी या वेळी दिला. लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्या की, विरोधी पक्षांवर कारवाई सुरु केली आहे. 90 टक्के केसेस विरोधी पक्षावर होतात. प्रियांका गांधींवरही त्याच पद्धतीने कारवाई करण्यात येत आहे, असा दावा सुळे यांनी केला. 


जरांगे पाटील लोकशाही मार्गाने लढत आहेत - सुळे 


मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील (Jarange Patil) लोकशाही मार्गाने लढत आहेत. त्यांचा लढा लोकशाही मार्गाने सुरु आहे, अशी प्रतिक्रिया सुळे यांनी जरांगे पाटलांच्या मुंबईत निघाणाऱ्या मोर्चावर दिली आहे. 


 


इतर महत्वाच्या बातम्या


राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाला वेग; विधानसभा अध्यक्षांसमोर जानेवारी महिन्यात होणार सुनावणी


 


सप्रिया सुळे यांची संपूर्ण मुलाखत