Nashik-Chennai Expressway: नाशिक–चेन्नई प्रवास आता फक्त 12 तासात, सहा राज्य अन् दोन तीर्थक्षेत्रांना थेट जोडणी, नेमका कसा असणार मार्ग? जाणून घ्या सविस्तर
Nashik-Chennai Expressway: देशातील सर्वात महत्त्वाकांक्षी महामार्ग प्रकल्पांपैकी एक असलेला सुरत–चेन्नई ग्रीनफील्ड एक्स्प्रेसवे उभारणीच्या दिशेने मोठ्या वेगाने पुढे जात आहे.

Nashik-Chennai Expressway: देशातील सर्वात महत्त्वाकांक्षी महामार्ग प्रकल्पांपैकी एक असलेला सुरत–चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे उभारणीच्या दिशेने मोठ्या वेगाने पुढे जात आहे. गुजरातपासून तामिळनाडूपर्यंत सहा राज्यांना जोडणारा हा दृतगती मार्ग नाशिकमधून जाणार असून, त्यामुळे शहरात सहा पदरी हाय-स्पीड एक्सप्रेसवे उभारण्याची तयारी सुरू झाली आहे.
Nashik-Chennai Expressway: नाशिक-चेन्नई दृतगती मार्ग ठरणार कॉरिडोरचा कणा
सुरतवरून चेन्नईला जोडणाऱ्या या सर्वात महत्त्वाच्या कॉरिडोरमध्ये नाशिक-चेन्नई दृतगती मार्ग हा मुख्य घटक असणार आहे. नाशिकमधून जाणाऱ्या या सहा पदरी मार्गामुळे शहराला देशाच्या पश्चिम आणि दक्षिण भागातील प्रमुख सागरी मार्गांशी थेट जोडणी मिळणार आहे.
Nashik-Chennai Expressway: दोन महत्त्वाच्या बंदरांना पहिल्यांदाच थेट जोडणी
हा दृतगती मार्ग नाशिकमधून पुढे सरकत पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराशी थेट जोडला जाईल. याव्यतिरिक्त तो थेट चेन्नई बंदराशीही जोडला जाणार आहे. यामुळे नाशिककरांना दोन मोठ्या बंदरांशी द्रुत व सरळ जोडणी, मालवाहतुकीसाठी जलद नेटवर्क आणि व्यापाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. हा एक्सप्रेसवे वाढवण आणि चेन्नई बंदरांना प्रथमच एका सरळ मार्गाने जोडण्याचा विक्रम करणार आहे.
Nashik-Chennai Expressway: प्रकल्पाचे दोन टप्पे; नाशिक–अक्कलकोट प्रवास अर्ध्यावर
प्रकल्प दोन प्रमुख टप्प्यांत राबवला जात असून पहिल्या टप्प्यात नाशिक–अक्कलकोट सहा पदरी दृतगती मार्गाचे 374 किमी अंतर समाविष्ट आहे.
- सध्या नाशिक–अक्कलकोट अंतर: 524 किमी
- विद्यमान प्रवास वेळ: 9 तास
- नव्या मार्गामुळे अंतर कमी होणार: 150 किमी
- नव्या दृतगती मार्गावरील प्रवास वेळ: सुमारे 4 तास
हा संपूर्ण प्रकल्प BOT (Build–Operate–Transfer) तत्त्वावर विकसित करण्यात येत आहे.
Nashik-Chennai Expressway: सहा राज्यांना जोडणारा देशातील दुसऱ्या क्रमांकाचा लांब मार्ग
सुरत–चेन्नई एक्सप्रेसवे गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या सहा राज्यांना थेट जोडणार आहे. दिल्ली–मुंबई एक्सप्रेसवेनंतर हा देशातील दुसरा सर्वांत लांब दृतगती मार्ग ठरणार आहे. नाशिकवरून चेन्नईकडे जाताना हा मार्ग थेट आंध्र प्रदेशात प्रवेश करील आणि धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या तिरुपतीला थेट जोडणी उपलब्ध होईल. पूर्वी हा प्रवास 22–23 तासांचा असे. नव्या एक्सप्रेसवेमुळे तो 12 तासांवर येणार आहे.
Nashik-Chennai Expressway: नाशिकमध्ये तीन महत्त्वाच्या महामार्गांशी थेट कनेक्टिव्हिटी
नाशिक जिल्ह्यात हा दृतगती मार्ग खालील प्रमुख ठिकाणांशी थेट जोडला जाणार आहे:
- आडगाव ट्रक टर्मिनल : मुंबई–आग्रा महामार्गाशी जोडणी
- गोंदे–दुमाला : तवा नाशिक एक्सप्रेसवेशी कनेक्टिव्हिटी आणि वाढवण बंदराचा थेट प्रवेश
- वावी (सिन्नर) : समृद्धी महामार्गाशी जोडणी
Nashik-Chennai Expressway: सहा तालुके, 70 गावांमधून मार्ग; 195 हेक्टर भूसंपादन
नाशिक जिल्ह्यातील सहा तालुके आणि अंदाजे 70 गावांमधून हा मार्ग जाणार आहे. या प्रकल्पासाठी 195 हेक्टर भूसंपादन करण्यात येणार असून, त्याबाबतची प्राथमिक तयारी सुरू आहे.
या कॉरिडोरवरील प्रमुख शहरे:
आणखी वाचा























