Nashik Accident : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी सिटीलिंक बसचा भीषण अपघात; चालकाचा ताबा सुटला अन् बस थेट उड्डाणपुलाच्या भिंतीवर आदळली!
Nashik Accident : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी सिटीलिंक बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे.

Nashik Accident : शहरात सिटी लिंक बसच्या अपघातांचे (Citylink Bus Accident) सत्र थांबत नाहीये. सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या अपघातात, एका बसचा उडाणपुलाच्या भिंतीवर जोरदार धडक बसल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात बस चालक गंभीर जखमी झाला आहे. मयूर निकम (28) असे गंभीर बस चालकाचे नाव आहे.
ही घटना बुधवारी (दि. 14) रात्री 12 वाजेच्या सुमारास घडली. CNG गॅस भरून बस तपोवन डेपोमध्ये परत जात असताना, चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस थेट उडाण पुलाच्या साईडच्या भिंतीवर आदळली. अपघात इतका भीषण होता की, यात बसचे मोठे नुकसान झाले आणि चालक गंभीर जखमी झाला आहे.
चालकावर उपचार सुरु
दरम्यान, बसमध्ये प्रवासी नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे. अपघातानंतर चालकाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याआधी, मंगळवारी देखील सिटीलिंक बसचा अपघात घडला होता. मंगळवारी एक सिटी लिंक बस चालकाला बस चालवत असताना अचानक 'फिट' आली होती. त्यामुळे चालकाचा बसवरील ताबा सुटला होता आणि बसने थेट तीन वाहनांना धडक दिली होती. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. मात्र, वाहनांचे मोठे नुकसान झाले होते.
बस चालकांच्या फिटनेस तपासणीचा प्रश्न गंभीर
या दोन सलग अपघातांनंतर सिटी लिंक बस चालकांच्या आरोग्य व फिटनेस तपासणीचा प्रश्न गंभीरपणे उभा राहिला आहे. वाहन चालवणाऱ्या चालकांची वैद्यकीय तपासणी वेळोवेळी केली जात आहे का? यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. शहरवासीयांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रशासनाने आणि सिटी लिंक व्यवस्थापनाने ताबडतोब योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे, अन्यथा भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
इतर महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजीनगरमध्ये 8 किलो सोनं अन् 40 किलो चांदी लुटली, बड्या उद्योजकाच्या घरावर दरोडा























