नाशिक : इगतपुरी तालुक्यातील (Igatpuri Taluka) भावली धरणात (Bhavali Dam) पाच जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा एकदा तालुक्यातील मुंढेगाव (Mundhegaon) येथील जिंदाल कंपनीजवळ असलेल्या शासकीय आश्रमशाळेच्या परिसरातील एका विहिरीत विवाहित महिलेसह मुलीचा मृतदेह आढळून आल्याने इगतपुरी हादरली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून इगतपुरी तालुक्यावर (Igatpuri Taluka) दुःखाचे सावट पसरले आहे.


याबाबत सविस्तर माहिती अशी की, प्रियंका नवनाथ दराणे (23) आणि वेदश्री नवनाथ दराणे (03) असे मृत्यू झालेल्या मायलेकींचे नाव आहे. विहिरीला कठडा नसल्यामुळे विहिरीजवळ गेलेली बालिका विहिरीत पडली. 


विहिरीत मायलेकीचा मृतदेह आढळल्याने खळबळ


बालिकेला वाचवण्यासाठी आईने धाव घेऊन उडी मारली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. या दोघीही येथून जवळच असणाऱ्या शेणवड खुर्द येथील रहिवासी आहेत. विहिरीत मायलेकीचा मृतदेह आढळल्याने एकाच खळबळ उडाली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपासाला सुरुवात करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या 


Pune Ink Attack: मोठी बातमी: कोर्टाबाहेर भावनांचा उद्रेक, विशाल अग्रवालच्या अंगावर शाईफेकीचा प्रयत्न, वातावरण तापलं


Nagpur News : आरटीई शालेय प्रवेश घोटाळा प्रकरणी आणखी एका पालकाला अटक; आतापर्यंत 20 पालकांविरोधात गुन्हे दाखल