Dhule Crime News : गेल्या काही दिवसांपासून धुळे (Dhule) शहरातील साक्री (Sakri) रोडवरून जाणाऱ्या ट्रॅव्हल्स चालकांना लुटण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बाहेरगावाहून येणाऱ्या ट्रॅव्हल्स चालकांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडून ५०० रूपये 'एन्ट्री' फी (Entry Fee) वसुल केली जात असून अशाप्रकारे धमकावून वसुली करणारा वन्या नामक लुटारू धुळे शहर पोलिसांच्या (Dhule Police) जाळ्यात सापडला आहे. 


याबाबत अधिक माहिती अशी की, गुजरातहून (Gujarat) धुळ्याच्या दिशेने मध्यरात्रीच्या सुमारास येणारी एक ट्रॅव्हल्स साक्री रोडवरील डॉ. सैंदाणे  यांच्या दवाखान्याजवळ दोघांनी अडविली. चाकूचा धाक दाखवून त्यांनी चालक आणि क्लिनरकडे 500 रूपये 'एन्ट्री' फी मागितली. 


लुटमारीचे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल


'सबको लागू है, जलदी दे, और गाड्या है हमाऱ्या, का खोपसू तुला...' असा धाक दाखवून त्यांनी चालकाकडून 500 रूपये घेतले. ही घटना आज मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, या लुटमारीचे दोन व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ही घटना शहर पोलिसांच्या हद्दीत घडल्याने शहर पोलीसही रात्रीच अलर्ट झालेत. त्यांनी सीसीटीव्हीची पडताळणी करून 'वन्या' ला पहाटे ताब्यात घेतले आहे.


भाजपच्या जिल्हाध्यक्षांवर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल 


भाजपचे धुळे जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर (Gajendra Ampalkar) यांच्या विरोधात पोक्सोअंतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल करण्याचे आदेश कोर्टाने (Court) दिले. तर चार जणांविरोधात इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. अल्पवयीन पीडितेच्या वतीने तिच्या बहिणीने कोर्टात धाव घेतल्याने हा आदेश पारित करण्यात आला. यामुळे धुळ्यात मोठी खळबळ उडाली.


इतर महत्वाच्या बातम्या


शेतातल्या घरातच चालवायचा बनावट देशी दारुचा कारखाना; पोलिसांचा छापा, आरोपीचा निघला काटा


Dhule Crime News : पोलिसांना बघताच दोघांची उडाली तारांबळ, थेट घुसले बाजरीच्या शेतात; अन् पुढे....