Nashik Girish Mahajan : अजितदादा, बंडखोरांची चिंता तुम्ही करू नका. पहाटे पहाटे तुम्ही आमच्यासोबत शपथ घेतली आहे. त्यामुळे तो म्हणण्याचा अधिकार तुम्हाला आहे. तुम्ही सकाळी सकाळी आला होता, त्यावेळी मी तुमच्यासोबत होतो, असा टोला मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी अजित पवारांना (Ajit Pawar) लगावला आहे. 


नाशिक (Nashik) येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठ येथे 22 वा दीक्षान्त समारंभ पार पडला. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी गद्दारीवरून शिंदे गटावर टिका करणारे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर महाजन यांनी निशाणा साधला. ते म्हणाले की, अजित पवार तुम्ही चिंता करू नका..कारण पहाटे पहाटे तुम्ही आमच्या सोबत शपथ घेतली आहे. तुम्हाला तसं म्हणायचा अधिकार आहे का? मी देखील त्या दिवशी सकाळी तुमच्या सोबत होतो. आमच्या सोबत आलेले सगळे लोकं निवडून येतील, त्याची काळजी आम्ही घेऊ. शिंदे गटाचे 50 लोकं आमच्यासेाबत आले आहेत. ते सगळे निवडून येतील, याची काळजी आम्ही निश्चितपणे घेऊ, असा विश्वास त्यांनी अजित पवार यांना दिला आहे. 


तर उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांच्यावर मंत्री गिरीश महाजन म्हणाले कि, निवडणुका या वर्षभर राहिलेल्या आहे. असं नसतं की, तुम्ही खाली उतरले, म्हणून निवडणुका घ्या. आम्ही जर असं म्हटलो असतो की, आमच्या भरवशावर तुमचे 18 खासदार आणि 55 आमदार निवडून आले. त्यावेळी आम्ही म्हटलो असतो निवडणुका घ्या..तुम्ही घेतल्या असत्या का..त्यावेळी तुम्ही पळून गेले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसले. आता वर्षभरात घोडा मैदान समोर आहे. असं चॅलेंजच मंत्री महाजन यांनी उद्धव ठाकरे गटाला दिले आहे. 


संजय शिरसाठ यांच्या विधानाबद्दल महाजन म्हणाले कि, ते काय म्हणाले मला नक्की माहित नाही. पण निश्चित आमच्या दोन अपेक्षित जागा कमी झाल्या. आम्ही हरलो आहे, ते आम्ही मान्य केलं आहे. तसेच दीक्षांत समारंभ प्रसंगी ते म्हणाले कि सद्यस्थितीत मेडिकल क्षेत्रात कट प्रॅक्टिस ही मोठी कीड लागलेली आहे. मध्यंतरी सरकार गेल्याने हा प्रश्न प्रलंबित राहिला. ही मोठी साखळी तयार झालेली आहे. खूप चांगले डॉक्टर या क्षेत्रात असून मात्र काही लोकांमुळे क्षेत्र बदनाम होत आहे. कठोर कायदे करण्यासाठी प्रयत्न होतील. जे काही प्रश्न प्रलंबित आहे, ते मार्गी लावले जातील. तसेच अवयव दान हा महत्त्वाचा विषय आहे. स्वयंइच्छेने लोक तयार होत नाही. मात्र जनजागृती अभियानाच्या माध्यमातून ते साध्य करण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही मंत्री महाजन यांनी दिले. 


अनिल देशमुख भाजपचं तिकीट घेण्यासाठी अग्रेसर होते...  


अनिल देशमुखांनी त्यांनी निवडणुकीच्या आधी किती वेळा आम्हाला भाजपमध्ये घ्या, असं म्हटलं होतं, त्यांनाच विचारा. आता त्यांची चौकशी सुरु आहे, ते बेलवर आहे, जशी जशी चौकशी होईल, तसं तसं ईडी समोर येईल. त्यांची एवढी ताकद आहे का, की ते सरकार पाडतील? त्यांनी थोडंसं आत्मपरीक्षण करावं. अनिल देशमुख भाजपचं तिकीट घेण्यासाठी अग्रेसर होते. आम्ही त्यांना नाकारलं. त्यांच्या सुदैवाने ते निवडून आले, गृहखाते त्यांना मिळाले. त्यांनी लाच मागितली, हे दुर्दैवाने झालं. आम्हाला वाटलं की, ते लकी माणूस आहे. आम्ही घेतलं नाही, तरी गृहमंत्री झाले. मात्र त्यांनी 100 कोटींचे हफ्ते मागितले आणि आता त्यांनी कायदेशीर लढाई लढावी, असा सल्ला गिरीश महाजन यांनी दिला आहे.