Manoj Jarange Patil, नाशिक : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या डॉक्टरवर त्यांच्या क्लिनिकमध्ये धुसून शाईफेक करण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या डॉक्टरच्या अंगावर शाई ओतून निषेध करण्यात आला आहे. नाशिकमध्ये हा प्रकार घडलाय. संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांकडून डॉक्टरच्या अंगावर शाई  टाकून निषेध नोंदवण्यात आलाय. जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचे सगेसोयरे मुसलमान असल्याची पोस्ट केल्याचा आरोप डॉक्टरवर करण्यात आलाय. नाशिकच्या सिडको भागातील डॉ. विजय गवळी यांच्या क्लिनिकमध्ये घुसून संभाजी ब्रिगेड कडून निषेध नोंदवण्यात आलाय. 


संभाजी ब्रिगेडचे डॉक्टरांना सवाल 


मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी येथील आंदोलनावर लाठीचार्ज झाला. त्याच्या तुम्ही निषेध नोंदवला का? निषेध नोंदवल्याचा काही पुरावा असेल तर दाखवा. दरम्यान, संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी आक्रमक झाल्यानंतर डॉक्टरकडून मी दक्षता घेईल, असं सांगण्यात आलं होतं. मात्र, आक्रमक झालेल्या पदाधिकाऱ्यांनी डॉक्टरांनी शाईफेक केली आहे. 


मनोज जरांगे पाटलांचा नारायण गडावर दसरा मेळावा 


मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या सरकारने अद्याप पूर्ण केलेल्या नाहीत. त्यांच्या मागण्यावर काम सुरु असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे. मात्र, मनोज जरांगे पाटील आता नारायण गडावर दसरा मेळावा घेणार आहेत. निवडणूक लागण्याच्या आत सरकारने आरक्षण दिलं तर ठीक नाही तर भाजपचे आमदार पाडणार असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय. शिवाय, नारायण गडावर होणाऱ्या दसरा मेळाव्यामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवार द्यायचे की पाडायचे याबाबतच निर्णय देखील घेण्यात येणार आहे. 


मनोज जरागेंच्या मागण्या कोणत्या? 


गेल्या वर्षभरापासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन आणि उपोषण करत आहेत. मराठ्यांना ओबीसीमधून सरसकट आरक्षण द्या. ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहे त्याच्या सोयऱ्यांनाही सरसरकट कुणबी प्रमाणपत्रक द्या. मराठा आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हा मागे घ्या, अशा अनेक मागण्या मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडे केल्या आहेत. मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्या, ही प्रमुख मागणी मनोज जरांगे यांची आहे. मात्र, याच मागणीबाबत डॉक्टरकांनी आक्षेपार्ह पोस्ट केल्याने त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या


भाजपसोबत राष्ट्रवादीने जावं हे प्रयोग ठरल्याप्रमाणे, मात्र ऐनवेळी त्यात काही बदल झाला; प्रफुल्ल पटेल यांचा पुनरुच्चार