Nashik Grampanchayat Result : दिंडोरीतून धक्कादायक निकाल, शिंदे गटाच्या नवनियुक्त जिल्हाध्यक्षाचा पराभव, पहा विजयी उमेदवार कोण?
Nashik Grampanchayat Result : दिंडोरीतून धक्कादायक निकाल, शिंदे गटाच्या नवनियुक्त जिल्हाध्यक्षाचा पराभव, पहा विजयी उमेदवार कोण?
Nashik Grampanchayat Result : नाशिकच्या (Nashik) ग्रामपंचायत निवडणुकीत (Gram panchayat Election Results) शिंदे गटाच्या (Shinde Gat) नवनियुक्त जिल्हाध्यक्षाचा पराभव झाला असून दिंडोरी (Dindori) तालुक्यातील तळेगावच्या सरपंचपदी राष्ट्रवादीच्या सोनाली चारोस्कर (NCP Sonali Charoskar) विजयी झाल्या आहेत. तर शिंदे गटाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष भाऊलाल तांबडे (Bhaulal Tambde) यांच्या पॅनलचा पराभव झाला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातुन हा महत्वाचा निकाल मानला जात आहे.
नाशिक जिल्ह्यातील 82 ग्रामपंचायतींच्या निवडणूक (Grampanchayat Election) निकालाचा कल हाती येत आहे. थोड्याच वेळात नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, कळवण (Kalwan) आणि नाशिक तालुक्यातील ग्रामपंचायत निकाल लागण्याची चिन्हे आहेत. तत्पूर्वी दिंडोरी तालुक्यातून एक धक्कादायक निकाल हाती आला आहे. येथील तळेगाव ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सोनाली चारोस्कर या विजयी झाल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांनी शिंदे गटातील नवनियुक्त ग्रामीण जिल्हाध्यक्ष भाऊलाल तांबडे यांचा पराभव केल्याचे ससमोर आले आहे. त्यामुळे सरकार स्थापनेनंतर हा पहिलाच मोठा पराभव असल्याचे बोलले जात आहे.
दिंडोरी तालुक्यात 50 ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया पार पडते आहे. काल रविवार मतदान झाल्यानंतर आज सकाळपासून मतमोजणीला सुरवात झाली. सुरवातीपासूनच दिंडोरी तालुक्यात राष्ट्रवादी आघाडीवर राहिली आहे. अशातच दिंडोरी तालुक्यातील तळेगाव येथील नवनियुक्त शिंदे गटाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष हे सरपंच पदासाठी उभे होते. तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या सोनाली चारोस्कर या उभ्या ठाकल्या होत्या. अखेर शिंदे गटाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष भाऊलाल तांबडे यांच्या पॅनलचा पराभव झाला असून तळेगाव ग्रापंचायतीच्या सरपंचपदी राष्ट्रवादीच्या सोनाली चारोस्कर विराजमान झाल्या आहेत.
राष्ट्रवादी आघाडीवर
नाशिक जिल्ह्यातील 82 ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकाल पहिला कल हाती आला असून राष्ट्रवादीने आघाडी घेतली असून दिंडोरी तालुक्यातील आणखी तीन जागांवर राष्ट्रवादीने विजय मिळवला आहे. दिंडोरी तालुक्यातील नळवाड पाडा ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी राष्ट्रवादीचे हिरामण गावित विजयी झाले आहेत. आंबेवणी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी राष्ट्रवादीच्या शोभा रामदास मातेरे, करंजवन ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचे संदीप गांगोडे विजयी झाले आहेत. तर दिंडोरी तालुक्यात 50 ग्रामपंचायतीमधून यापूर्वी जवळपास 173 सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. तर 05 उमेदवार सरपंच पदासाठी बिनविरोध निवडून आले आहे.
असा आहे आतापर्यंतचा निकाल
दरम्यान नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील एकूण 50 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. काल रविवारी मतदान केंद्रावर मतदान झाले. त्यानंतर आज सकाळपासुन मतमोजणीचा सुरवात झाली. त्यानंतर दुपारी एक वाजेपर्यंत निवडणूक निकालाचा काल हाती आला. त्यानुसार दिंडोरी तालुक्यातील 46 ग्रामपंचायतीपैकी 11 ग्रामपंचायत निकाल हाती आले असून यामध्ये शिवसेना 02, शिंदे गट 0, भाजप- 0, राष्ट्रवादी- 8, काँग्रेस 0, माकप 0, इतर 1 अशा जागा आलेल्या आहेत.