Mission Admission : नाशिकमध्ये अकरावीच्या 25 हजार जागा, प्रवेश प्रक्रिया लवकरच
Mission Admission : नाशिक (Nashik) शहरात साठ कनिष्ठ महाविद्यालय (Colleges) असून त्यात कला, वाणिज्य, विज्ञान व संयुक्त शाखा मिळून प्राथमिक माहितीनुसार सुमारे 25 हजार उपलब्ध जागा आहेत.
Mission Admission : दहावीच्या परीक्षेचा ऑनलाईन पद्धतीने निकाल लागल्यानंतर आता अकरावी प्रवेश प्रक्रिया कडे लक्ष लागले आहे. अकरावी प्रवेशासाठी यंदाही केंद्रे ऑनलाइन पद्धतीने प्रक्रिया राबवली जाणार आहे. नाशिक शहर राज्यभरातील प्रमुख शहरातील कनिष्ठ महाविद्यालयात ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेद्वारे विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार आहेत.
दहावीचा निकालापूर्वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया अंतर्गत अर्जाचा भाग एक भरण्याची सुविधा 30 मेपासून सुरू करण्यात आली आहे. या प्रक्रियेद्वारे आतापर्यंत 13 हजार विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. प्रवेश अर्जाचा भाग 1 व भाग 2 या पद्धतीने प्रवेशाची सर्व प्रक्रिया होईल. नाशिक शहरात साठ कनिष्ठ महाविद्यालय असून त्यात कला वाणिज्य विज्ञान व संयुक्त शाखा मिळून प्राथमिक माहितीनुसार सुमारे 25 हजार उपलब्ध जागा आहेत. नाशिकसह राज्यातील मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, अमरावती, नागपूर या महापालिका क्षेत्रात ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया होत आहे तर ग्रामीण भागात तसेच इतर शहरांमध्ये ऑफलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया होईल.
दरम्यान दहावीच्या निकालानंतर अकरावीची प्रवेश प्रक्रिया थोड्याच दिवसांत सुरु होईल. यासाठी ऑनलाईन अर्जासह कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक असते. यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रॅक्टिस व्हावी, यासाठी 23 ते 27 मे दरम्यान डेमो रजिस्ट्रेशन ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. प्रवेश अर्ज कसा भरावा, अर्ज भरताना कोणती माहिती आवश्यक आहे, याची माहिती विद्यार्थ्यांना सुविधेमुळे मिळाली. 30 मे पासून या संकेतस्थळावर प्रवेश अर्ज भाग एक भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये वैयक्तिक माहितीसह इतर माहिती भरणे अनिवार्य असेल.
तसेच अकरावीचा अर्ज प्रमाणित करून घेता येणार आहे. त्याशिवाय आयडी व पासवर्ड वापरून लॉगीन करता येईल. त्याशिवाय आयडी व पासवर्ड वापरून ऑनलाइन शुल्क भरून फॉर्म लोक करणे आणि अर्ज प्रमाणित करण्यासाठी मार्गदर्शन केंद्र निवडणे अशा सुविधादेखील उपलब्ध होणार आहेत. माध्यमिक शाळा आणि मार्गदर्शक केंद्राने विद्यार्थ्यांनी भरलेले प्रवेश अर्ज एक मधील माहिती तपासून प्रमाणित करणे अनिवार्य असल्याचे सांगण्यात आले आहे.
अशी होईल प्रवेश प्रक्रिया
अकरावीचे प्रवेश हे 11thadmission.org.in संकेतस्थळाच्या माध्यमातून केंद्रे ऑनलाइन पद्धतीने होतील. 2022-23 मधील इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रिया लवकर सुरू होईल. त्याबाबत वेळापत्रक या पोर्टलवर जाहीर करण्यात येईल. तोपर्यंत विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे जमा करून ठेवावीत. पोर्टल सुरू झाल्यानंतर प्रवेश अर्ज भरण्याची टप्पे पहिल्या टप्प्यात विद्यार्थी नोंदणी दुसऱ्या टप्प्यात प्रवेश आजचा भाग एक भरणे व तिसऱ्या टप्प्यात प्रवेश आजचा भाग दोन भरणे असे टक्के असतील. प्रवेश अर्ज भाग दोनमध्ये विद्यार्थ्यांना पसंतीची कनिष्ठ महाविद्यालय निवडून तो क्रम नोंदविण्याची प्रक्रिया दहावीच्या निकालानंतर सुरू होणार आहे.
अकरावीसाठी अशा आहेत जागा
नाशिक शहरातील कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता अकरावीच्या पंचवीस हजार जागा असून यामध्ये कला शाखेच्या 4910 वाणिज्य शाखेच्या 08 हजार 680 तर विज्ञान शाखेच्या 10 हजार 520 आणि संयुक्त शाखा 1270 अशा एकूण 25 हजार 380 जागा कनिष्ठ महाविद्यालयाच्या आहेत.