एक्स्प्लोर

Nashik News : हारतुरे आणू नका, जल्लोष साजरा करू नका ! आमदार सुहास कांदे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन 

Nashik News : नांदगाव मतदारसंघातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना साथ दिल्याचे आमदार सुहास कांदे (MLA Suhas Kande) यांनी सांगितले. 

Nashik News : ठाकरे कुटुंबियांबद्दल (Udhhav Thakaray) आम्हाला आदर आहे, आम्ही शिवसेना (Shivsena) सोडली नाही, नांदगाव मतदारसंघातील (Nandgoan Assembly) पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी बंडाचा झेंडा हाती घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना साथ दिल्याचे आमदार सुहास कांदे (MLA Suhas Kande) यांनी सांगितले. 

राज्यात बंडाच्या राजकीय घडामोडीनंतर व सत्ता बदलानंतर नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार कांदे मतदारसंघात परतले. यावेळी त्यांनी शिंदे यांना समर्थन देण्यामागची भूमिका स्पष्ट केली. आमदार सुहास कांदे राज्यात सत्ता स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच मतदारसंघात दाखल झाले. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांची संवाद साधत नव्या युती सरकारकडून तालुक्यातील विकास कामे करू, जनतेला न्याय देऊ असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. 

आमदार सुहास कांदे हे नांदगाव मतदारसंघांत येण्यापूर्वी शिर्डीचा साईबाबा चरणी नतमस्तक झाले. एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी निवड व्हावी, यासाठी आमदार कांदे यांनी शिर्डीच्या साईबाबा चरणी साकडे घातले होते. ते फेडण्यासाठी शिर्डीला गेलेले आमदार कांदे परतल्यानंतर त्यांच्या हनुमान नगरातील निवासस्थानी आले. आमदार कांदे यांनी कुणीही हारतुरे आणू नका, जल्लोष साजरा करू नका, सत्ताबदल हे निमित्त असले व त्यात सुख असले तरी त्यात एक दर्द आहे, अशी भावना व्यक्त केली. दरम्यान सत्कारासाठी आतुर असलेल्या कार्यकर्त्यांनी आम्ही हे हारतुरे सांभाळून ठेवतो. तुम्ही मंत्री झालात तर ते कामाला येतील, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

यावेळी आमदार कांदे म्हणाले, गड जिंकला तरी विकासाची जबाबदारी पार पाडायची आहे. मतदारसंघाच्या विकासाचा अनुशेष भरून काढायचा आहे. करंजवण योजना केवळ तत्कालीन मंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकवर्गणीचा 15 कोटींचा अडसर शासनाने पैसे भरून दूर केला. अन्यथा, मनमाड नगर परिषदेला हा पैसा भरणे अशक्य होते. पुरातून उद्‌ध्वस्त झालेल्या नांदगावच्या वस्तीसाठी संरक्षक योजना असो की 78 खेड्यांची नांदगाव शहराची पाणीपुरवठा योजना असो. मतदारसंघातील विकासकामांसाठी मिळणाऱ्या निधीत अनेक झारीतले शुक्राचार्य आडवे येत होते. उद्धव साहेबांपुढे या समस्या अनेकदा मांडल्या. महाविकास आघाडीत शिवसेनेच्या आमदारांचा जीव विकास निधीसाठी घुसमटत होता. मातोश्रीशी असलेली नाळ तुटू नये, यासाठी आपण स्वतः शेवटपर्यंत प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. 

धनुष्यबाण चिन्ह नक्कीच मिळेल!
मुंबई सोडली तेव्हा सुरवातीला आम्ही 20 आमदार सोबत होतो. नंतर गुवाहाटीला ही संख्या वाढली. बाळासाहेब ठाकरे हे महापुरुष असल्याने त्यांचा फोटो आमच्या फलकावर वापरता येणार आहे. शिवाय पुढच्या कायदेशीर लढाईत धनुष्यबाण हे चिन्ह आम्हाला नक्कीच मिळेल, असा आत्मविश्‍वास आमदार कांदे यांनी व्यक्त केला. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Maharashtra CM : शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वरVarsha Bunglow Meeting : शपथविधीआधी महत्वाच्या खात्यासंदर्भात ठोस निर्णय? 'वर्षा'वर खलबतंDevendra Fadnavis Maharashtra Vidhansabha : भाजप विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी निवड, देवेंद्र फडणवीस पुन्हा आलेABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6PM 04 December 2024

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Maharashtra CM : शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
Maharashtra CM : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
Embed widget