Nashik Pune Highway : नाशिक-पुणे औद्योगिक एक्सप्रेसवेचा श्रीगणेशा, लवकरच वाहनधारकांच्या सेवेत
Nashik Pune Highway : समृद्धी महामार्ग 9Samrudhhi Highway) पूर्णत्वास येत असताना, महाराष्ट्राने पुणे-नाशिक (Pune-Nashik) या औद्योगिक द्रुतगती मार्गांवर काम सुरू केले आहे.
Nashik Pune Highway : पुणे (Pune), अहमदनगर आणि नाशिक (Nashik) जिल्ह्यांतील नागरिकांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी 180 किलोमीटर लांबीचा औद्योगिक द्रुतगती महामार्गाची (Industrial Expressway) महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) उभारणी करण्यात येत आहे. समृद्धी महामार्ग (Samrudhhi Highway) पूर्णत्वास येत असताना, महाराष्ट्राने पुणे-नाशिक (Pune-Nashik) या औद्योगिक द्रुतगती मार्गांवर काम सुरू केले आहे.
दरम्यान महारेलच्या (Maharail) माध्यमातून पुणे ते नाशिक दरम्यान सेमी हायस्पीड (Highspeed Railway) रेल्वे मार्ग उभारण्याचे नियोजन सुरू आहे. म्हणजेच सध्या या प्रकल्पांतर्गत रेल कम रोड (Rail Cum Road) हा प्रकल्प राबविला जाणार आहे. त्यानंतर याच मार्गाला समांतर पुणे-नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्गाची उभारणी करण्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंळाचे नियोजन आहे. हा महामार्ग पुणे, नाशिक, अहमदनगर या तीन जिल्ह्यांना जोडणार आहे. त्यातून या भागातील औद्योगिक विकासाला आणखी चालना मिळेल. पुणे-नाशिक 250 किमी लांबीचे नवीन आणि जुने औद्योगिक क्षेत्र आणि टाऊनशिप जोडण्यासाठी हा प्रकल्प दृष्टीपथात आहे. (डीपीआर) आणि ग्रीनफिल्ड एक्स्प्रेसवेसाठी भूसंपादनाची आवश्यकता एमएसआरडीसीने डीपीआर पूर्ण करण्यासाठी 18 महिन्यांची मुदत दिली आहे.
सद्यस्थितीत पुणे ते नाशिक प्रवासासाठी 4 ते 5 तासांचा कालावधी लागतो. या औद्योगिक द्रुतगती महामार्गाच्या उभारणीनंतर हा वेळ दोन तासांवर येणार आहे; तसेच या भागातील ऑटोमोबाइल इंडस्ट्री, आयटी इंडस्ट्री आणि कृषी उद्योगाच्या वाढीला चालना मिळेल, असा प्रयत्न ‘एमएसआरडीसी’कडून केला जात आहे. हा सहा लेनचा महामार्ग असून पुणे रिंगरोड येथून व नाशिक येथे सुरच-चेन्नई ग्रीनफिल्ड कॉरिडॉरला जोडणार आहे. त्याचप्रमाणे समृद्धी महामार्गाप्रमाणे महामार्ग पूर्णपणे प्रवेश नियंत्रित राहील. या महामार्गामुळे पुणे-नाशिक प्रवासास केवळ दोन तास लागणार आहेत.ऑटोमोबइल इंडस्ट्री, आयटी इंडस्ट्री आणि कृषी उद्योगवाढीस मिळणार चालना मिळणार असून सुरत ते चेन्नई महामार्गास जोडणीमुळे पुणे सुरतचा प्रवासही वेगवान होणार आहे.
दोन तासांत अंतर पार
पुणे-नाशिक अंतर दोन तासांत पार करणे शक्य होणार आहे. या प्रकल्पाची सुसाध्यता तपासणे आणि प्रकल्पाचा आराखडा तयार करण्याकरीता सल्लागाराच्या नियुक्तीसाठी ‘एमएसआरडीसी’ने निविदा काढल्या आहेत. ‘हा महामार्ग पुणे, नाशिक, नगर या तीन जिल्ह्यांना जोडणार आहे. यातून या भागातील औद्योगिक विकासाला आणखी चालना मिळेल. या महामार्गाचा सुसाध्यता अहवाल आणि सविस्तर प्रकल्प अहवाल येत्या वर्षभरात प्राप्त होईल,’ अशी माहिती ‘एमएसआरडीसी’चे सह व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी दिली.