Nashik News : गेल्या तीन दिवसांपासून नाशिक (Nashik) जिल्ह्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. सगळीकडे नदी, नाले, विहिरी तुडुंब भरले आहेत. पावसाने (Rain) बळीराजा देखील सुखावला आहे. मात्र एवढा पाऊस पडूनही महिलांचा पाण्यासाठीचा संघर्ष आजही जैसे थे आहे. नाशिक (Nashik District) जिल्ह्यातील शेंद्री पाडा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. येथील महिला भर पुरात पाण्याचा हंडा डोक्यावर घेत वाट काढत आहेत.


नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक (Trimbakeshwer) जवळील शेंद्रीपाडा काही महिन्यांपूर्वी चर्चेत आला होता. येथील महिला लाकडी बल्ल्यांवरून जीवघेणा प्रवास करून पाणी आणत होत्या. हे हे दृश्य थेट तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पर्यंत पोहोचले. आणि आदित्य ठाकरे यांनी स्वतः शेंद्रीपाड्यात भेट देत या महिलांसाठी लोखंडी पूल बांधून दिला. मात्र हा पाण्यासाठीचा संघर्ष इथेच थांबला नाही.


पावसाळा सुरू होऊन महिना उलटला आहे. गेल्या दोन दिवसापासून नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे नदी नाल्यांना पूर देखील आला आहे. विहिरी देखील पाण्याने भरलेले आहेत. मात्र पाण्यासाठीचा संघर्ष आजही तसाच आहे. शेंद्रीपाडा येथील महिलांना आजही पुरातून वाट काढत पाणी आणण्यासाठी जावे लागत आहे.


दरम्यान त्र्यंबकेश्वर तालुक्यात जोरदार पाऊस सुरू असून शेंद्री पाडा येथील महिलांना गावाजवळील नदीतून प्रवास करीत झऱ्यावरून पाणी आणावे लागत आहे. या संदर्भांतील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही महिला डोक्यावर हंडा घेऊन नदीपार करून जाताना दिसत आहे. दुसऱ्या बाजूला असलेली महिला त्या महिलेचा हंडा घेण्यासाठी उभी असलेली व्हिडिओत दिसत आहे.


दोन दिवसांपूर्वी एबीपी माझा घटनास्थळी...
दरम्यान दोन दिवसांपूर्वी नाशिक एबीपी माझा ची टीम या गावातील शाळेतील मुलांच्या जीवघेण्या प्रवासाची ग्राउंड रिपोर्ट करण्यासाठी गेली होती. येथील मुलांना नदीतून प्रवास करीत शाळेत जावे लागत असल्याचा ग्राउंड रिपोर्ट एबीपी माझा ने समोर आणला होता. त्यानंतर आता या महिलांना पाण्यासाठी नदीतून प्रवास करावा लागत आहे.


आदित्य ठाकरे शेंद्री पाड्यात
तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे याच गावात काही महिन्यांपूर्वी आले होते. येथील महिलांना लाकडी बल्ल्यावरून पाण्यासाठी प्रवास करावा लागत होता. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी या दखल घेत येथे लोखंडी पूल बांधून दिला होता. मात्र त्यानंतरही येथील महिलांचा जीवघेणा प्रवास जैसे थे असल्याने हा पाण्यासाठीचा संघर्ष थांबणार कधी? असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही.