Nashik Vande Bharat : प्रवाशांच्या सेवेसाठी वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) तीन दिवस मुंबई ते शिर्डी आणि मुंबई ते सोलापूर या मार्गावर धावणार आहे. मात्र या एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे. एक्सप्रेसचे तिकीटदर समोर आले असून मुंबई ते नाशिकसाठी (Mumbai To Nashik) 550 रुपये मोजावे लागणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे ड्रीम प्रोजेक्ट असलेली वंदे भारत एक्सप्रेस लवकरच मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते शिर्डी अशी धावणार आहे. त्यासाठी राज्यभरात चाचणी घेण्यात आली. तर येत्या 10 फेब्रुवारीला वंदे भारत एक्सप्रेसचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. दरम्यान वंदे भारत एक्सप्रेसचे तिकीटदर समोर आले असून आतापर्यतचे हे सर्वाधिक दर असल्याचे बोलले जात आहे. या गाडीची चाचणी करण्यात आली तर दुसरी वंदे भारत ही 7 ते 8 फेब्रुवारीच्या दरम्यानमध्ये रेल्वेच्या ताफ्यात दाखल होणार आहे. दुसरीकडे मुंबईहून नाशिकला (Nashik) येणाऱ्या वंदे भारत प्रवाशांसाठी महागडी ठरणार आहे.
10 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या वंदे भारतला हिरवा झेंडा दाखविला जाणार असून दाखला जाणारे आत्मनिर्भर भारत या उपक्रमा अंतर्गत वंदे भरात एक्सप्रेसची बांधणी करण्यात आली आहे. वंदे भारत प्रकारातील ही सातवी रेल्वे गाडी असल्याचं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान मुंबई ते नाशिक मार्गाचा तिकीटदर निश्चित करण्यात आला असून यामध्ये चेअर कारसाठी 550 रुपये तर एक्झिक्यूटिव्ह कोर्टसाठी 1150 रुपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे नाशिककरांच्या खिशाला कात्री बसणार आहे.
दरम्यान दोनच दिवसांपूर्वी वंदे भारत एक्सप्रेक्स इगतपुरी स्थानकात चाचणीसाठी दाखल झाली होती. या पार्श्वभूमीवर वंदे भारत घाटामधून कसा प्रवास करते याची चाचपणी घेण्यात आली. मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनल येथून जवळपास सकाळी 11.00 वाजता वंदे भारत निघाली आणि इगतपुरी दरम्यान ती 1.00 ते 1.30 वाजेच्या सुमारास पोहोचेली. या गाडीमध्ये रेल्वेचा ठराविक स्टाफ आणि अधिकारी वर्ग उपस्थित होता. कसारा विभाग घाट सेक्शन असल्याने येथून मार्गस्थ होणाऱ्या रेल्वे गाड्यांना घाट चढण्यासाठी मागून बँकर (इंजिन) लावावे लागतात. मात्र वंदे भारत एक्सप्रेसने बिना बँकर घाट पार केला असून तिला कुठल्याही प्रकारचे बँकर लावण्यात आलेले नाहीत. या गाडीच्या दोन ते तीन दिवस चाचणी फेऱ्या पार पडल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.
असे आहेत वंदे भारत एक्सप्रेस तिकीट दर
मुंबई ते पुणे चेअर कारसाठी 560 रुपये ते एक्झिक्यूटिव्ह कोर्टसाठी 1135 रुपये, मुंबई ते सोलापूर चेअर कारसाठी 965 रुपये तर एक्झिक्यूटिव्ह कोर्टसाठी 1970 रुपये, मुंबई ते नाशिकसाठी चेअर कार 550 रुपये तर एक्झिक्यूटिव्ह कोर्टसाठी 1150 रुपये, मुंबई ते शिर्डी चेअर कार 800 रुपये तर एक्झिक्यूटिव्ह कोर्ट साठी 1630 रुपये मोजावे लागणार आहेत. तर वंदे भारत एक्सप्रेस दादर, ठाणे आणि नाशिकरोड येथे थांबेल. इगतपुरी ते पुणतांबा दरम्यान ही ट्रेन ताशी 110 किमी वेगाने धावेल.