Vande Bharat Train : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथं वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) दाखल झाली आहे. वंदे भारत एक्सप्रेसने मुंबईला (Mumbai) येत असताना एक इतिहास केला आहे. इतिहासात पहिल्यांदाच एखादी गाडी कोणत्याही प्रकारचे बँकर इंजिन न लावता लोणावळा (Lonavala) आणि खंडाळा (Khandala) येथील बोरघाट उतरून आली आहे. येणाऱ्या काळात देखील या दोन्ही वंदे भारत एक्सप्रेस कसारा येथील थल घाट आणि लोणावळा येथील भोर घाट कोणतेही बँकर इंजिन न लावता चालवल्या जाणार आहेत. त्यासाठी या अत्याधुनिक अशा ट्रेनमध्ये विशेष पार्किंग ब्रेक्स लावण्यात आले आहेत, जेणेकरून उतार आणि चढाव यावर ही गाडी अपघातग्रस्त होणार नाही


एका दिवसात शिर्डी आणि पंढरपूरला जाणं शक्य होणार


मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus) भारताची सर्वात अत्याधुनिक आणि पूर्णतः भारतीय बनावटीची वंदे भारत एक्स्प्रेस पहिल्यांदाच दाखल झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते 10 फेब्रुवारीला दोन वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. त्यासाठी पहिली वंदे भारत एक्स्प्रेस मुंबईत दाखल झाली आहे. या दोन वंदे भारत एक्सप्रेसमुळं एका दिवसात शिर्डी आणि पंढरपूर अशा महाराष्ट्रातल्या दोन्ही अतिशय महत्त्वाच्या तीर्थस्थळावर एकाच दिवशी जाऊन दर्शन घेऊन पुन्हा मुंबईला येणे शक्य होणार आहे. 


 






कशी असेल वंदे भारत एक्स्प्रेसची वेळ?


सीएसएमटीवरून साईनगर शिर्डीसाठी सकाळी 6 वाजून 15 वाजता ट्रेन सुटणार आहे. तिथे ही ट्रेन 12 वाजून 10 ला पोहोचेल. परत तिथून संध्याकाळी 5 वाजून 25 ला सुटणार आहे. मुंबईला 11 वाजून 18 ला पोहोचणार आहे. तर सोलापूरसाठी सी एस एम टी वरुन 6 वाजून 5 मिनीटांनी सुटणार आहे. तर सोलापूरला 12 वाजून 35 मिनिटांनी पोहोचेल. तर सोलापूर येथून संध्याकाळी 4 वाजून 10 मिनिटांनी ही ट्रेन सुटणार आहे. ती मुंबईला रात्री 10 वाजून 40 मिनीटांनी पोहोचेल.


सिद्धेश्वर एक्सप्रेस (उद्यान एक्सप्रेस) रेल्वेनंतर आता मुंबईला जाण्यासाठी सोलापूरकरांना 18 डब्यांची ‘वंदे भारत’ एक्सप्रेस असणार आहे. 11 फेब्रुवारी रोजी वंदे भारत एक्सप्रेस सकाळी 6.05 वाजता मुंबईला निघेल आणि दुपारी साडेबारापर्यंत मुंबईत पोहोचेल. काल या ट्रेनची ट्रायल रन झाली आहे.



 


महत्त्वाच्या बातम्या:


Vande Bharat Express: लातूर रेल्वे कारखान्यात वंदे भारत एक्स्प्रेसची निर्मिती होणार; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती