Nashik Dada Bhuse : शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) हे राष्ट्रीय पुरुष असून ते एका कुटुंबापुरते मर्यादित नाहीत. आजोबा चोरले म्हणणे चुकीचे असून हा मनाचा कोतेपणा आहे, असे प्रत्युत्तर दादा भुसे (Dada Bhuse) यांनी आदित्य ठाकरे यांना दिले आहे.
आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे नाशिक (Nashik) दौऱ्यावर असून एका सभेत बोलताना त्यांनी शिंदे सरकारमधील आमदारांवर घणाघात केला आहे. यावर पालकमंत्री दादा भुसे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. हा मनाचा कोतेपणा आहे, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे राष्ट्रीय पुरुष असून एका कुटुंबापुरते मर्यादित नाहीत. मग कुणीतरी म्हणेल की, आमचे छत्रपती शिवाजी महाराज (Shiwaji Maharaj) चोरले, कुणी म्हणतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar) चोरले, कुणी म्हणतील महात्मा फुले चोरले, अस थोडी चालतय... म्हणून नुसतं नावाने होत नाही तर महापुरुषांनी जी शिकवण कार्यकर्त्याने अंगिकारणे महत्वाचे असल्याचे भुसे म्हणाले. अशी शिकवण भाषणापुरती मर्यादित न राहता ती कृतीतून पुढे आली पाहिजे, असेही ठणकावून सांगितले.
यंदा नाशिकमध्ये वसंत व्याख्यानमालेचे (Vasant Vyakhyanmala) शंभरावे वर्ष साजरे होत आहे. या निमित्ताने बैठकीनंतर ते भुसे बोलत होते. यावेळी ते म्हणाले, मागील सहा महिन्यांपासून तीन शब्दांच्या पुढे एक शब्द नाही, आता कीव येते आहे. ठाण्यामधून निवडणूक लढविणार या आव्हानावर भुसे म्हणाले, आमच्या काही ग्रामपंचायत सदस्यांनीही आव्हान दिले आहे की, आमच्या ग्रामपंचायतीतून निवडणूक लढवून दाखवा. या बोलण्याला काही अर्थ असतो काय. उगाच लोकांची काहीतरी दिशाभूल करायची. गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या राज्यासमोर अनेक प्रश्न आहेत. शेतकरी, कामगारांच्या संदर्भातले प्रश्न असतील त्या विषयावर चर्चा केली पाहिजे. त्यावर कोण बोलत नाही, चांगलं काम केलेलं असेल, त्याच्यावर बोललं पाहिजे.
एखाद्या कामामध्ये सुधारणा केली पाहिजे ते बोलले पाहिजे. हे सरकार चांगलं काम करत असून सामान्यातल्या सामान्य माणसाचा विचार करून हे सरकार काम करत आहे. याचा सर्वोच्च बिंदू येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राच्या तमाम नागरिकांना दिसून येईल, असा विश्वास देखील भुसे यांनी यावेळी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरेंची शिकवण उराशी बाळगून तळागाळातील शिवसैनिक काम करत आहे. त्यांच्या शिकवणुकीनुसार 80 टक्के समाजकारण 20 राजकारण ठेवून काम केले जात आहे. लोकशाही प्रक्रियेमध्ये कुठेही फिरायला मुभा आहे, मनोगत असेल ते मांडणे हा सर्वस्वी ज्याचा त्याचा अधिकार आहे. तीन ते चार हजार शेतकऱ्यांचा कार्यक्रम करून आलो असून आम्ही सतत लोकांना मध्ये राहतो.
धक्के सांगायचे नसतात...
आदित्य ठाकरे बरोबर येत असताना दुसरीकडे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. जवळपास 50 हून अधिक ज्येष्ठ शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केला यावर भुसे म्हणाले की, धक्के हे सांगायचे नसतात, लवकरच आणखी धक्के देऊ. जुन्या काळातील शिवसैनिक आता शिंदे गटात येत आहेत, त्यांचे विचार शिकवण तळागाळातील जगातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
वसंत व्याख्यानमालेचे शंभरावे वर्ष...
नाशिक व्याख्यानमाला आयोजित करण्यात येत आहे. हे शंभरावे वर्ष असल्याने मोठ्या उत्साहात साजरे करण्याचा निर्णय झालेला आहे. सर्व नाशिककरांच्या माध्यमातून ही वसंत व्याख्यानमालेचा राज्यामध्ये नव्हे तर देश पातळीवर त्याचा नावलौकिक आहे. तो पुढे नेण्याचे कार्य आम्ही करत असून व्याख्यानमालेत वेगवेगळ्या देशांमधून ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये परिपूर्ण कामगिरी संपन्न केलेल्या व्यक्तिमत्वांना व्याख्यानमालेमध्ये समावेश केलेला आहे. या व्याख्यानमालेच्या माध्यमातून अनेकांना प्रेरणा मिळेल. त्यांच्या जीवनामध्ये यशस्वी होण्याच्या दृष्टिकोनातून ही व्याख्यानमाला संपन्न होणार आहे. या व्याख्यानमालेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील निमंत्रित केले जाणार असल्याचे भुसे म्हणाले.