Nashik Satyajeet Tambe : काल-परवापर्यंत 50 केसेस आंदोलनाच्या होत्या. त्यामुळे पासपोर्ट मिळत नव्हता, मी आंदोलनातून तयार झालेलो असून त्यामुळे माझ्यावर घराणेशाहीचा आरोप चुकीचा असल्याचे सत्यजीत तांबे यांनी सांगत विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 


नाशिक (Nashik) पदवीधर मतदार संघाचे अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून निफाड, विंचूर चांदवड आणि मालेगाव, धुळे असा त्यांचा दौरा असणार आहे. निफाड (Niphad) शहरातील चौकात कार्यकर्त्यांनी तांबे यांच स्वागत केले असून आज विविध संस्थांना सत्यजीत भेटी देणार आहेत. दरम्यान नाशिक (Nashik Graduate Constituency) दौऱ्यावर येण्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. ते यावेळी म्हणाले, माझ्या वडिलांनी पंधरा वर्षात ऋणानुबंध या मतदारसंघात जमवले असून लोकांची मन जिंकण्याचा काम डॉक्टर तांबेनी केले आहे. थोरात-तांबे परिवाराचा संपर्क या मतदारसंघात आहे. पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन अनेक कार्यकर्ते आज माझ्यासोबत आहेत. हाच ऋणानुबंध जपण्याची माझ्यावर जबाबदारी आली आणि त्याच ताकतीने मी ती पुढे घेऊन जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 


सत्यजीत तांबे पुढे म्हणाले की, मुंबई दिल्लीत बसलेल्या लोकांना ग्राउंड परिस्थिती माहित नाही.. ग्राऊंडवरील लोकं प्रेमाने आमच्याबरोबर जोडलेली आहे.. निवडणूक जिंकणं हा महत्त्वाचा मुद्दा नाही, मात्र निवडणुकीच्या निमित्ताने लोकांपर्यंत जाणे संपर्क करणे आणि त्यांचा प्रश्न समजून घेणे आणि त्यांचा असलेला ऋणानुबंध व्यक्त करण्याचा माझा प्रयत्न आहे. सर्व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते माझ्यासोबत आहे. सर्वपक्षीय कार्यकर्ते माझ्यासोबत असून या ठिकाणी एक पक्ष नाहीत, तर शिवसेना, भाजप काँग्रेस सगळे आहे.. आणि पक्षाला हीच ग्राउंड वरची परिस्थिती माहित नसल्याचे तांबे यांनी यावेळी सांगितले. 


घराणेशाहीचा आरोप चुकीचा... 


तसेच आज नाशिक जिल्हा धुळे जिल्हा प्रचार दौरा करणार आहे. सात दिवस निवडणुकीला बाकी असून प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. युवकांनी निवडणूक हाती घेतली आहे. युवकांचे प्रश्न असतील किंवा उद्योगधंदे बाबत वेगवेगळे प्रश्न आहेत. हे प्रश्न सगळे सोडवण्यासाठी एक हक्काचा प्रतिनिधी मिळणार आहे, असे युवकांमध्ये चित्र आहे. 22 वर्ष संघटनेत काम करतोय. वयाच्या 17 व्या वर्षी राजकारणाला सुरुवात केली. देशातलं एकही राज्य अस नाही जिथे मी पोहोचलो नाही, राज्यातील एकही तालुका असा नाही, जिथे पक्ष संघटनेचा काम केलं नाही. माझ्यावर काल-परवापर्यंत 50 केसेस आंदोलनाच्या होत्या. त्यामुळे मला पासपोर्ट मिळत नव्हता, मी आंदोलनातून तयार झालेलो असून त्यामुळे माझ्यावर घराणेशाहीचा आरोप चुकीचा आहे..


राजकीय भाष्य नंतर करेल... 


2009 पासून आम्ही सर्व पक्ष, सगळ्या जाती, विविध संघटना यांना एकत्र घेऊन पदवीधर मतदारसंघात काम करतो आहे. हीच डॉक्टर तांबेनी निर्माण केलेली या मतदारसंघातील ताकद आहे. ज्यांना तांबे परिवार माहिती आहे, त्यांना सगळ्यांना माहिती आहे की, आम्ही कधीही कोणाची फसवणूक करू शकत नाही. त्यामुळे आता तुम्ही सर्वानी मदत करा, राजकीय भाष्य नंतर करेल, सध्या तुमच्या संवाद साधने महत्वाचे आहे. त्यामुळे नाशिक पदवीधर मतदारसंघात फिरतो आहे. मतदारसंघातील प्रश्न सगळे सोडवण्यासाठी एक हक्काचा प्रतिनिधी मिळणार असल्याचे सत्यजीत तांबे यांनी सांगितले.