Nashik Grampanchayat Election : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील चार तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक (Grampanchayat Election) निकाल घोषित होत असून आतापर्यत चारही आतालुक्यातील काही ग्रामपंचायतींचा निकाल (Grampanchayat Election Result) हाती आला आहे. त्यानुसार जिल्ह्यात राष्ट्रवादीची (NCP) सरशी असून त्या पाठोपाठ लालबावटा सुसाट आहे. तर त्यांनतर अनुक्रमे शिवसेना (Shivsena), भाजप आणि काँग्रेस असल्याचे चित्र आहे. अद्याप संपूर्ण निकाल येणे बाकी असून फक्त इगतपुरी तालुक्यातील निकालाचे चित्र स्पष्ट झाले आहे. 


इगतपुरी तालुक्यातील पाचही ग्रामपंचायतीचे निकाल घोषित
नाशिक जिल्हयात इगतपुरीत (Igatpuri) काँग्रेसने (Congress) खाते उघडले असून आवली दु या ग्रामपंचायतीवर विजय मिळवला आहे. तर कऱ्होले ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी, भावली बु ग्रामपंचायतीवर मनसे तसेच अडसरे खू येथील ग्रामपंचायतीवर शिवसेना ठाकरे गटाने विजय मिळवला आहे. तर भरवज ग्रामपंचायतीवर अपक्ष उमेदवार निवडून आला आहे. अडसरे खू येथील ग्रामपंचायतीवर काळू साबळे यांची निवड झाली आहे. 


त्र्यंबकेश्वर तालुक्यातील (Trimbakeshwer) दहा जागांचे निकाल लागले असून आतापर्यंत राष्ट्रवादीची सरशी ठरली आहे. तर दोन जागांवर शिंदे गटाने विजय मिळवला आहे.  त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वेळे ग्रामपंचायतीत शिंदे गटाची सरशी झाली आहे. शिंदे गटाच्या देवचंद पाटील यांचा विजय झाला आहे. त्र्यंबक तालुक्यातील रोहिले व माळेगाव ग्रामपंचायतीवर शिंदे गटाने विजय मिळवला आहे. रोहिले येथील रतन खोडे यांची सरपंचपदी निवड झाली आहे. तर माळेगाव च्या ग्रामपंचायत सरपंचपदी वंदना गोरख दिवे यांची निवड झाली आहे. 


सुरगाणा तालुक्यात माकप लाल बावटा सुसाट, आतापर्यंत 12 ग्रामपंचायतीवर विजय 
नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील बारा ग्रामपंचायतीचे निकाल हाती आले आहेत. यानुसार करंजुल ग्रामपंचातीवर माकप विजय मिळवला आहे. प्रभाबाई राठोड यांची सरपंच पदी निवड झाली आहे. तसेच पोहाडी, अंबाठा, ग्रामपंचायतीवर माकपने विजय मिळवला आहे. पोहाडी सरपंचपदी सुनिता दळवी, अंबाठा सरपंचपदी चौरे हरी महारू, तर डोल्हारे सरपंचपदी राष्ट्रवादीचे राजेंद्र गावित विजयी झाले आहेत.  
सुरगाणा तालुक्यातील सरपंच 
उंबरपाडा - चिमण लक्ष्मण पवार (आघाडी), घोडांबे - माया भोये (माकप), शिंदे दिघर - पुंडलिक पवार (राष्ट्रवादी काँग्रेस), रोकडपाडा - अनिता राजू पवार (राष्ट्रवादी काँग्रेस), सराड - नामदेव भोये (अपक्ष), डांगराळे - रतन आबाजी गावित, राहुडे - सुषमा विष्णू गांगुर्डे (शिवसेना), प्रतापगड - वनिता विजय दळवी (भाजप), माळेगाव- अनिता भागवत गवळी माकप, कळमणे- पांडुरंग गावित माकप, चिकाडी- सदू मनोहर बागुल माकप. 


पेठ तालुक्यातील 23 ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर, बारा जागांवर राष्ट्रवादी, दहा जागावर अपक्ष
नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील 69 पैकी 23 ग्रामपंचायतीचे निकाल घोषित झाले असून बारा जागांवर राष्ट्रवादी तर एका जागेवर शिवसेना तसेच दहा जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. तर सुरगाणा तालुक्यातील खोकरी ग्रामपंचायतीवर गाव विकास आघाडी सत्ता मिळवली आहे. गवळी कशिराम येऊ सरपंचपदी विराजमान झाले आहेत. तर कोठुळा ग्रामपंचायत सरपंचपदी अपक्ष उमेदवार काजंल गुबांडे हे निवडून आले आहेत.