Gram Panchayat Election Results 2022 LIVE Updates: एक हजार 79 ग्रामपंचायतींच्या मतमोजणीला सुरुवात, अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, सर्वात जलद निकाल एबीपी माझावर

राज्यातील 18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांमधील 1 हजार 166 ग्रामपंचायती आणि थेट सरपंचपदासाठी 74 टक्के मतदान झालंग्रामपंचायती आणि थेट सरपंचपदासाठीच्या निवडणुकांचा आज निकाल आहे

Advertisement

एबीपी माझा ब्युरो Last Updated: 17 Oct 2022 02:59 PM

पार्श्वभूमी

मुंबई: राज्यात रविवारी झालेल्या ग्रामपंचायती आणि थेट सरपंचपदासाठीच्या निवडणुकांचा  (Maharashtra Gram Panchayat Election Result) आज निकाल आहे. राज्यातील 18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांमधील 1 हजार 166 ग्रामपंचायती आणि थेट सरपंचपदासाठी 74...More

Wardha Gram Panchayat Election Election Results:वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यात काँग्रेसचे सात पैकी चार उमेदवार विजयी

Wardha Gram Panchayat Election Election Results:  वर्धा जिल्ह्यातील नऊ ग्रामपंचायत मतदान झाले त्यापैकी सात ग्रामपंचायत या आर्वी तालुक्यातील आहे.  आर्वी तालुक्यातील सात ग्रामपंचायतीपैकी चार ग्रामपंचायती कॉंग्रेसच्या वाट्याला आल्या आहेत तर भाजपाच्या वाट्याला दोन ग्रामपंचायती आल्याने तालुक्यात सध्या कॉग्रेसचा जल्लोश पाहायला मिळते आहे.  



  • ग्रामपंचायत हैबतपुर सरपंच - सचिन पाटील  काँग्रेस समर्थक

  • ग्रामपंचायत पिपरी पुनर्वसन सरपंच - रजाक अली लियाकत काँग्रेस समर्थक

  • मिरझापूर (नेरी) - बालाभाऊ सोनटक्के  भाजप समर्थक 

  • अहिरवाडा ग्रामपंचायत - सरपंच -विना  वलके भाजप समर्थक

  • ग्रामपंचायत जाम पुनर्वसन - सरपंच - राजकुमार मनोरे भाजप समर्थक

  • ग्रामपंचायत सर्कसपूर  - गजानन हनवते  काँग्रेस समर्थक

  • ग्रामपंचायत मांडला - सुरेंद्र धुर्वे काँग्रेस समर्थक

  • सालोड हिरापूर -  अमोल कन्नाके भाजप समर्थक  

  • बोरगाव नांदोरा - शामसुंदर खोत  भाजप समर्थक

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.