Nashik News : मणिपूरमध्ये (Manipur) आदिवासी आणि बिगर आदिवासींमध्ये झालेल्या (Manipur Violence) संघर्षातून दोन आदिवासी महिलांवर झालेल्या अत्याचाराचे प्रकरण समोर आले. या घटनेने सारा देश अस्वस्थ असून देशभरात संतापाची लाट उसळली आहे. देशभरातून आंदोलने, सोशल मीडियाच्या माध्यमातून निषेध नोंदवला जात आहे. या घटनेचे पडसाद नाशिकमध्ये (Nashik) देखील उमटले असून आनंद निकेतन या शाळेत घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे. 


गेल्या काही दिवसांपासून हिंसाचाराच्या घटनांनी मणिपूर हादरले आहे. अशातच दोन ते अडीच महिन्यापूर्वीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर देशभर संताप व्यक्त व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून तर सोशल मीडियावर मणिपूरच्या घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे. यात नाशिकमधून आनंद निकेतन (Anand Niketan School) या शाळेने घटनेचा निषेध नोंदवला आहे. संबंधित शाळेतील 9 वी, 10 वीच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना देशाच्या पूर्वोत्तर भागात घडलेली घटना समाज माध्यमातून समजलेली होती. त्यावर शाळेत चर्चा झाली. आपापसात आणि वर्गात तासाला देखील मुलांमध्ये चर्चा सुरु होती. या सर्वांचा विचार करून शाळेच्या व्यवस्थापनाकडून निषेध सभा घेण्यात आली आहे. 


मणिपूरमध्ये आदिवासी आणि बिगर आदिवासींमध्ये झालेल्या (Manipur Violence) संघर्षातून दोन आदिवासी महिलांवर झालेल्या अत्याचाराचे प्रकरण समोर आले. त्यानंतर देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्रातही या घटनेच्याविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान सोशल मीडियावर देखील मोठा उहापोह करण्यात येत आहे. याच माध्यमातून नाशिकच्या आनंद निकेतन शाळेतील मुलांना घटनेची माहिती  मिळाली. शिक्षकांसह शाळा व्यवस्थापनाने ही बाब लक्षात घेऊन दोन समूहांच्या भांडणात महिलांना अशाप्रकारे वापरणं चूक आहे, ही अत्यंत शरमेची बाब आहे. आपण याचा निषेध केला पाहिजे, असा निष्कर्ष काढल्यानंतर शाळेत निषेध सभा घेण्यात आली. 


यावेळी आनंद निकेतन शाळेत आयोजित निषेध सभेत मुलांच्या पालकांना देखील सभेला येण्याचं आवाहन करण्यात आलं. मुलांनी तयार केलेले फलक सभेच्या ठिकाणी लावण्यात आले होते. या सहवेदना जाणीव सभेच्या आयोजनामागची भूमिका शाळेच्या वतीने सांगण्यात आली. निषेधाच्या ठरावावर सर्वांनी सह्या केल्या. यावेळी शाळेत लावण्यात आलेले विविध फलक लक्ष वेधून घेत होते यात 'मणिपूर येथील काळिमा फासणाऱ्या घटनेचा आम्ही आनंद निकेतनचे विद्यार्थी निषेध करीत आहोत.' 'का स्वीकारताय बघ्याची भूमिका, अप्रत्यक्षपणे समर्थन दर्शवताय का?' 'भारताचे नागरिक शांत का?' 'रिस्पेक्ट हर, नॉट बीकॉझ शी इज अ वुमन, रिस्पेक्ट हर बीकॉझ शी इज अ ह्युमन' अशा प्रकारचे फलक शाळेच्या भिंतीवर लावण्यात आले असून ते सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.


राज्यभरातून घटनेचा निषेध 


मणिपूरमध्ये आदिवासी आणि बिगर आदिवासींमध्ये झालेल्या (Manipur Violence) संघर्षातून दोन आदिवासी महिलांवर झालेल्या अत्याचाराचे प्रकरण समोर आले. त्यानंतर देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्रातही या घटनेच्याविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. मणिपूरमध्ये उसळलेली दंगल, महिलांवर होत असलेले अत्याचाराच्या विरोधात राज्यातील प्रागतिक पक्षांच्या आघाडीने 25 जुलै रोजी आंदोलनाची हाक दिली आहे.


ही बातमी वाचा: 


Manipur violence: मणिपूर येथे महिलांवरील अत्याचार प्रकरणी राज्यात ठिकठिकाणी आंदोलन, दोषींवर कठोर कारवाईची मागणी