एक्स्प्लोर

Nashik News : नाशिक पोलिसांकडून ड्रोन व्यावसायिकांवर अन्याय, नाशिक छायाचित्रकार संघटना आक्रमक 

Nashik News : नाशिक (Nashik) शहरात असलेल्या ड्रोन बंदीवर (Drone Bann) नाशिक छायाचित्रकार संघटनेने आक्षेप घेतला आहे.

Nashik News : कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन स्कूल (Army Aviation School) पाठोपाठ संरक्षण संशोधन व विकास प्रतिष्ठानच्या प्रयोगशाळा परिसरात ड्रोनची (Drone Fly) घुसखोरी झाल्याच्या घटनेची दखल घेत पोलिसांनी (Nashik Police) शहरातील सर्व दोन मालक चालकांना आपले ड्रोन तात्काळ स्थानिक पोलीस ठाण्यात जमा करण्याच्या आदेश दिले आहेत. मात्र पोलिसांनी काढलेल्या आदेशाला नाशिक छायाचित्रकार संघटनेने विरोध केला आहे. कुठलीही चर्चा न करता एकतर्फी हा फतवा काढला असल्याचे नाशिक (Nashik) छायाचित्रकार संघटनेचे म्हणणे आहे.  

दरम्यानचा ड्रोनचा वापर करण्यासाठी पोलीस परवानगी आवश्यक आहे. मात्र तशी परवानगी न घेता ड्रोन सर्रास उडवले जात आहेत. गांधीनगर येथील लष्करी एव्हिएशन स्कूल अर्थात कॅट्स हवाई क्षेत्रात रात्रीच्या सुमारस ड्रोनने घुसखोरी केली होती. नंतर डीआरडीओच्या भिंतीलगत प्रतिबंध क्षेत्रात पुन्हा तसाच प्रकार घडला होता. या दोन्ही प्रकरणातील ड्रोनचा छडा अद्याप लागलेला नाही. बेकायदेशीर ड्रोनच्या उड्डाणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी शहरातील ड्रोन चालक मालक व संचालन करणाऱ्या आपल्या दोन ते ज्या भागात वास्तव्यास अथवा व्यवसाय करतात. तेथील स्थानिक पोलीस ठाण्यात तात्काळ जमा करण्याचे आदेश दिले आहेत. दोन द्वारे चित्रीकरण करावयाचे असल्यास आधी लेखी परवानगी घ्यावी लागेल ही परवानगी दाखवल्यानंतर पोलीस ठाण्यातून दोन मिळेल चित्रीकरण ही पोलिसांच्या देखरेखित होईल. 

त्यानंतर छायाचित्रण झाल्यानंतर ड्रोन पुन्हा संबंधित पोलीस ठाण्याला जमा करावा लागणार आहे. या निर्णयाचे पडसाद छायाचित्रकारांच्या वर्तुळात उमटत आहेत. नाशिक छायाचित्रकार संघटनेचे पाचशेच्या आसपास सदस्य असून संघटनेचे सदस्य नसलेल्या छायाचित्रकाशी संख्या त्यापेक्षा कितीतरी मोठी आहे. नाशिक शहरातील अनेक खाजगी संस्था, व्यक्तींकडे ड्रोन आहेत. लग्न सोहळ्याच्या निमित्ताने बाहेरगाहून छायाचित्रकार येतात. या सर्वांची स्पष्टता कशी होईल? त्यांच्यावर कशी निर्बंध ठेवणार ? असे प्रश्न छायाचित्रकार संघटनेने उपस्थित केले आहेत. तसेच काहींनी व्यवसायाच्या दृष्टीने आपल्या ड्रोनची नोंदणी केली आहे, परंतु बरेचसे खाजगी ड्रोन आहेत, त्यांची कुठेही नोंद नाही. शिवाय ऑनलाईन ड्रोन खरेदी करण्यावर कोणाचेही निर्बंध नाहीत. काही छायाचित्रकारांचा व्यवसाय पूर्ण ड्रोनवर अवलंबून आहे. पोलिसांच्या निर्णयामुळे संबंधितांचे मोठे आर्थिक नुकसान होईल. छायाचित्रणाची मागणी कुठल्याही वेळी येते. तेव्हा यंत्रणे कडून तातडीने परवानगी, पोलिसात जमा केलेला ड्रोन परत मिळणे व कर्मचारी उपलब्ध होईल का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

छायाचित्रकारांना विश्वासात घेऊन ड्रोनबाबत नियमावलीची गरज संघटनेने मांडली. लग्न, मिरवणूक व तत्सम सोहळ्यात अतिशय कमी क्षमतेचे ड्रोन वापरले जातात. छायाचित्रण हा व्यवसाय आहे. त्यावर पोलीस एक प्रकारे निर्बंध घालत असल्याची भावना छायाचित्रकारांच्या वर्तुळात उमटत आहे. पोलिसांनी शहरात 16 संवेदनशील ठिकाणे सुरक्षेच्या दृष्टीने मानवहीत विमानांच्या उड्डाणास म्हणजेच प्रतिबंध क्षेत्र अर्थात नो फ्लाय झोन होऊन म्हणून जाहीर केलेली आहेत. या परिसराच्या दोन किलोमीटरच्या परिघात ड्रोनच्या उडविण्यास मनाई आहे. 

ड्रोन बाबत पोलिसांनी काढलेला आदेश हा व्यवसायिक छायाचित्रकारांवर अन्याय करणार आहे त्यातून काहीही साध्य होणार नाही शहरातील 10 टक्के छायाचित्रण काळांकडेच ड्रोन असतील, परंतु इव्हेंट व्यवस्थापन व इतर खाजगी व्यक्तींकडे किती ड्रोन असेल याचा तपशील नाही दरम्यान हा एकतर्फी निर्णय असून प्रशासनाने याबाबत पुन्हा एकदा चर्चा करून योग्य निर्णय घ्यावा अशी सूचना नाशिक छायाचित्रकार संघटनेचे अध्यक्ष संजय जगताप यांनी केली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Top 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP MajhaPankaja Munde : पंकजाताईंना पाहताच कुटुंबियांनी फोडला टाहो; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटलाCm Eknath Shinde Meeting : मुख्यमंत्री शिंदेंच्या मुंबईतील नंदनवन बंगल्यावरील बैठक संपन्नABP Majha Headlines : 05 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
Embed widget