Nashik Sanjay Raut : नाशिक (Nashik) पदवीधरची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केले आहे. नाशिक पदवीधरची निवडणूक बिनविरोध होणार नाही, असं संजय राऊतांनी ठणकावलं आहे.  त्यामुळे नाशिक पदवीधर निवडणुकीत ठाकरे गट मोठा डाव टाकण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत तसंच त्यांनी विरोधक असतानाही मविआत समन्वय हवा असा सल्ला दिला आहे.  बारा वाजता निवडणुकीसंदर्भात मातोश्रीवर त्या संदर्भात बैठक घेणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.


नाशिक पदवीधर निवडणुकीत (Nashik Padvidhar election) मोठा गोंधळ उडाला असून सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीमुळे काँग्रेससह भाजप, राष्ट्रवादी शिवसेनेतही खळबळ उडाली आहे. एकीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana Patole) यांनी देखील याबाबत रोष व्यक्त केला असताना आता संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महत्वाचं विधान केलं आहे. नाशिक पदवीधर निवडणूक बिनविरोध होणार नाही. ज्या पद्धतीने महाविकास आघाडीने एकत्रितपणे सरकार चालवलं. तोच समन्वय, तोच एकोपा विरोधी पक्षात काम करत असताना असायला हवा, तरच आपण सर्व लढाया एकत्रितपणे लढू शकतो, अशी शिवसेनेची भूमिका आहे. नाशिक पदवीधर निवडणुकीच्या बाबतीत गोंधळ झाला आहे, हे मान्य करावेच लागेल. मात्र केवळ काँग्रेस पक्ष समजून नव्हे तर महाविकास आघाडी समजूनच त्याकडे बघायला पाहिजे पदवीधरच्या पाचही जागा संदर्भात एकत्रित बसून निर्णय व्हायला हवा होता. नागपूर, अमरावती जागे संदर्भात काळजीपूर्वक निर्णय होऊन अपेक्षित होतं ते झालं नाही, कुणाला दोष देत नाही, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.


नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी काँग्रेसकडून सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती मात्र अखेरच्या दिवशी सुधीर तांबे यांनी माघार घेत अर्जच भरला नाही सत्तेतील सत्यजित तांबे यांचा अपक्ष उमेदवार अर्ज भरला अखेरच्या दिवशी घडलेल्या राजकीय नाट्यामुळे काँग्रेसला चांगला धक्का बसला. दरम्यान सत्यजित तांबे यांना पाठिंबा देणार नसल्याचे काँग्रेसने जाहीर केल्याने सत्यजित तांबे वगळता काँग्रेस कोणत्या अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देणार हे देखील पहावे लागणार आहे. 


संजय राऊत म्हणाले... 


महाविकास आघाडी सरकार एका कॉमन मिनिमम प्रोग्रॅमवर समन्वय राखून चालवलं. त्यामुळे विरोधी पक्षात असतानाही समन्वय असावा ही अपेक्षा. विधानपरिषद निवडणुकीत गोंधळ झालाच हे मान्य, नाकारू शकत नाही. काँग्रेस बाबत गोंधळ झाला तरी तो महाविकास आघाडी म्हणून मान्य असून समन्वय राखून उमेदवार निवड झाली नाही. अमरावतीला आमच्याकडे उमेदवार होता. नाशिकमध्ये जो घोळ झालाय, त्याबद्दल कोणालाच जबाबदार धरण्यात येणार नाही. अशा उलट्या पालट्या सगळ्याच पक्षात होत असतात. काँग्रेस एकनिष्ठ तांबे यांना भाजपनं गुप्तपणे नेमकं काय केलं, हे प्रत्येकवेळी आपल्याला समजतं असं नाही. त्यांनी जी चूक केली त्याला तेच जबाबदार असून महाविकास आघाडीत निर्णय घेताना समन्वय राखणं आवश्यक हे शिवसेनेचं स्पष्ट मत असल्याचे ते म्हणाले.