Nashik Igatpuri Fire : नवीन वर्षाच्या सुरवातीलाच नाशिकच्या (Nashik) इगतपुरी परिसरात असलेल्या जिंदाल कंपनीत (Jindal Fire) भीषण आग लागली. सुमारे 48 तासांनंतर काहीअंशी आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले. दरम्यान नाशिक महापालिका (Nashik NMC) अग्निशमन विभागाने जिंदाल कंपनीला आग विझवण्याचे पाच लाख 66 हजारांचे बिल पाठवल्याचा प्रकार समोर आला आहे.
साधारण जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात इगतपुरी (Igatpuri) तालुक्यातील मुंढेगाव ग्रामपंचायत हद्दीतील पॉलिफिल्म कंपनी असलेल्या जिंदाल प्लांटमध्ये गॅस गळती होऊन भीषण आगीची घटना घडली होती. यात घटनेत तीन कामगाराचा मृत्यू झाला तर अन्य काही कामगार जखमी झाले होते. आग एवढी भीषण होती कि, कळसुबाई शिखरावरून हे दृश्य कॅमेऱ्यात टिपण्यात आले होते. शिवाय आकाशात धुळीचे लोट दोन दिवसांपर्यंत होते. या सर्व आग विझवण्याच्या व बचावकार्यात नाशिक मनपाच्या अग्निशमन दलाने विशेष मेहनत घेतली. याच मेहनतीचे बिल जिंदाल कंपनीकडून मागविण्यात आले आहे. जवळपास साडे पाच लाखांचे अग्निशमन विभागाने संबंधित कंपनी व्हावं स्थापनाला पाठविण्यात आले आहे.
दोन आठवड्यापुर्वी इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील जिंदाल कंपनीत लागलेल्या भीषण आगीत दोन कामगारांचा मृत्यू झाला. तर 19 कामगार जखमी झाले.आगीची तीव्रता इतकी होती की, आकाशात उंचच उंच आगीचे व धुराचे प्रचंड लोट उसळले होते. कसळूबाई शिखरावरूनही या आगीचा धूर दिसत होता. आजुबाजुच्या दहा गावांना स्फोटाचे हदरे बसले होते. ही आग विझविण्यासाठी महापालिका अग्निशमन विभागाचे आठ बंब सलग दोन दिवस कार्यरत होते. अग्निशमन विभागाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर ही आग विझवण्यात पथकाला यश आले. 35 मीटर शिडिचा उपयोग करण्यात आला होता. अग्निशमन विभागाने जिंदाल कंपनी प्रशासनाला सेवा पुरविल्याचे बील पाठवले आहे.
दरम्यान एक तासाला एक हजार रुपये यानूसार पाच लाख 66 हजार रुपयांचे बील पाठवले आहे. आग जरी चौवीस तासात विझवण्यात आली तरी पुन्हा स्फोट होउन आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास सुरक्षेचा उपाय म्हणून दोन दिवस अग्निशमन विभागाचे बंब कंपनी परिसरात सज्ज ठेवण्यात आले होते. अग्निशमन विभागाकडून खासगी संस्था, कंपनीला सेवा दिल्यास त्याबदलात शुल्क आकारले जाते. अग्निशनमविभागाच्या आठ बंबांद्वारे ही मोठी आग विझवण्यात आली होती. सद्यस्थितीत कंपनीत लागलेल्या आगीची उच्चस्तरीय चौकशी सुरु असून यासाठी एक समिती नेमण्यात आली असून हि समिती सध्या जिंदाल कंपनी व्यवस्थापन, कामगार यांच्याशी चर्चा करत असल्याची माहिती आहे. त्यामुळे लवकरच या आगीचा सविस्तर अहवाल समोर येणार आहे.