एक्स्प्लोर

Pitru Paksh 2022 : पितृपक्षात नारायण नागबली, कालसर्प पूजा विधी का करतात? त्र्यंबकेश्वरला भाविक वेटिंगवर

Pitru Paksh 2022 : पितृपक्षाच्या (Pitru Paksha) निमित्ताने त्र्यंबकेश्वर शहरात नारायण नागबली, कालसर्प आदी पूजा विधीसाठी भाविकांची गर्दी वाढली आहे.

Pitru Paksh 2022 : पितृपक्षात (Pitru Paksha) आर्थिक व्यव्यहार शक्यतो केले जात नाहीत, मात्र ह्याच पितृपक्ष त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) येथील नागरिकांसाठी फलदायी ठरतो आहे. पिंडाला काकस्पर्श होवो अथवा ना होवो, त्र्यंबकेश्वर नगरीचे अर्थकारण मात्र रुळावर आले असून मागील दोन वर्ष कोरोनाचा (Corona) फटका बसल्यानंतर आता त्र्यंबकेश्वर नगरीत रेलचेल दिसून येत आहे..

त्र्यंबकेश्वर नगरीत भाविकांची ही गर्दी दोन वर्षानंतर पाहायला मिळते आहे. कोरोना काळात सर्व व्यवहार बंद झाले होते. पूजापाठ धार्मिक विधींना परवानगी नसल्यानं आर्थिक उलाढाल ठप्प झाली होती.. यंदा मात्र सरकाने निर्बंध हटविल्याने श्रावण महिन्या पाठोपाठ पितृपक्षात भाविकांचा ओघ बघायला मिळतो आहे. त्रिपिंडी, नारायण नागबली या पूजासाठी देशभरातुन भाविक त्र्यंबकेश्वर नगरीत दाखल होत आहेत. त्यामुळे दोन वर्षांचा बॅकलॉग भरून निघतो आहे. पुरोहित, हॉटेल व्यवसायिक, पूजा साहित्य, फुल प्रसाद विक्रेते, नाभिक, खाजगी सर्वजनिक वाहतूक या साऱ्यांनाच रोजगार प्राप्त झाला  असून अर्थचक्र गतिमान झाले आहे. 

कालसर्प शांती, नारायण नागबली, त्रिपिंडी ह्या पूजा त्र्यंबकेश्वर नगरीत वर्षभर तिथीनुसार केल्या जातात. पितृपक्षात मात्र हि संख्या दुपटीने वाढलेली असते. त्र्यंबकेश्वरमध्ये देशभरातून दररोज हजारो भाविक दाखल होतात.  बहुतांश भाविक नारायण नागबली, त्रिपिंडी पूजा करतात, या माध्यमातून दिवसाकाठी लाखो रुपयांची उलाढाल होते आहे. कालसर्प शांतीला 2100 ते 3000 नारायण नागबलीला 5 ते 8 हजार आणि त्रिपिंडी साठी 3 हजारापर्यंत खर्च येतो. यात काही भाविकांची गुरुजींच्या घरी राहण्या खाण्याची सोय असते. अन्यथा 300 रुपया पासून तर 1500 रुपयांपर्यंतच्या रूम्स उपलब्ध आहेत. मुंडन करण्याचे  साधारण 100 रुपये दर आहे. प्रसाद पूजा साहित्य 10 रुपया पासून तर शंभर दीडशे रुपया पर्यंत भाविकांकडून घेतले जातात. नारायण नागबली पूजेसाठी घेतली जाणारी पांढरी वस्त्र साडेतीनशे रुपयात मिळतात. त्यासाठी अंतर्वस्त्र, रुमाल घ्यायचे असतील तर  तोच आकडा 500 रुपयांपर्यंत जातो. तर वाहनाच्या नगर प्रवेशासाठी 50 ते 150 रुपयाचं शुल्क आकारले जाते. त्यापोटी दिवसाकाठी हजारो रुपयांचे उत्पन्न ठेकेदाराच्या माध्यमातून नगरपरिषदेला मिळत असल्यानं पितृपंधरवड्यात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. .

श्रध्येपोटी हजारो किलोमीटरचा प्रवास करून भाविक त्र्यंबकेश्वर नगरीत येत असतो. पूजा केल्यानं सुख शांती, नांदते स्थिर्य लाभते अशी भाविकांची भावना आहे.  त्यामुळे भाविकांचे  पूर्ण समाधान झाले होणे गरजेचे आहे. त्र्यंबकेश्वर नगरीचेही लोकसंख्या साडेतेरा ते चौदा हजारच्या आसपास आहे. इथे दिवसाकाठी 20 ते 25 हजार भाविक येत असतात. त्यामुळे अस्वछतासह नागरी सुविधांवर ताण पडतो. दर बार वर्षांनी कुंभमेळा भरत असल्यानं त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी विशेष निधीची मागणी होत आहे. पितृ पक्षात नवीन आर्थिक व्यव्यहार करत नाहीत. शुभ कार्यासाठी पितृ पंधरवड्या नंतरचा मुहूर्त शोधतात, मात्र हाच पितृ पंधरवडा त्र्यंबकवासियांना गेल्या अनेक पिढ्यापासून धार्जिणा ठरतो आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amruta Fadnavis Full Speech : नाव न घेता ठाकरे-पवारांवर हल्ला, अमृता फडणवीसांचं UNCUT भाषणMahayuti Meeting : जागावाटपासंदर्भात वर्षा बंगल्यावर महायुतीची खलबतंABP Majha Headlines : 11 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray on Ladki Bahin Yojana : 'लाडकी'च्या निधीवरुन 'राज'कीय फटकारे Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Embed widget