Nashik Crime : नाशिकच्या (Nashik) बहुचर्चित सुनील वाघ खून प्रकणातील आठ आरोपीना न्यायालयाने दोषी ठरवेल असून एकाला जन्मठेपेची तर चार जणांना सात वर्षांची आणि तिघांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. खुनाच्या गुन्ह्यात सहभागी भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांना सात वर्षाची शिक्षा सुनावण्यात अली आहे. या प्रकरणात भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांचा समावेश असल्याचे समोर आले आहे.
नाशिकच्या पंचवटीतील (Panchavati) हनुमानवाडी परिसरात क्रांतीचौकामध्ये भेळविक्रेता सुनील वाघ (Sunil Wagh Murder) याची दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. या प्रकरणी सराईत गुंड कुंदन परदेशी यास नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने (Nashik court) जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. तर, खूनाच्या कटातील चार आरोपींना सात वर्षे आणि मारहाणीत तिघांना दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. त्याचप्रमाणे, खूनाच्या कटात सहभागी असल्याच्या आरोपातील अजय बागुलसह 10 जणांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. दरम्यान, न्यायालयाने सरकारी पंचांसह 15 फितूर झालेल्या साक्षीदारांविरोधात खोटी साक्ष दिल्याप्रकरणी रितसर कारवाईचे आदेशही दिले आहेत.
दरम्यान या प्रकरणात राकेश कोष्टी आणि व्यकटेश मोरे या दोघांचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे या दोघांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी नुकताच भाजप मध्ये प्रवेश केला होता. राकेश कोष्टी याच्याकडे भारतीय जनता पार्टी पक्षाच्या माथाडी कामगार आघाडीचा जिल्हाध्यक्ष पद, तर व्यंकटेश मोरे यांच्याकडे भारतीय जनता पार्टी पक्षाच्या माथाडी कामगार आघाडीचा शहराध्यक्ष पद देण्यात आलं होत. सुनील वाघ यांचा भेळ भत्त्याचा गाडा होता. वाघ कुटुंबीय आणि कुंदन परदेशी यांचे अनेक दिवसापासून वाद होते. 27 मे 2016 ला दोघांमध्ये वाद झाला. त्याचे पर्यवसन हाणामारी आणि सुनील वाघ यांच्या खुनात झाले. कुंदन परदेशी याने त्याच्या साथीदाराच्या मदतीने सुनील वाघ यांचा खून केला.
सात जणांना सश्रम कारावास
सुनिल वाघ याच्या डोक्यात दगड घालून मारल्याच्या प्रकरणी कुंदन परदेशीला जन्मठेपची शिक्षा सुनावण्यात आली तर हत्येचा कट रचून सहभागी झालेल्या उर्वरीत 7 जणांना दोषी ठरविण्यात आले आहे. खूनाच्या कटातील सहभागी राकेश कोष्टी, जयेश दिवे, व्यंकटेश मोरे, किरण नागरे यांना प्रत्येकी 7 वर्षे सश्रम कारावास आणि मारहाणीच्या गुन्ह्यात अक्षय इंगळे, रवींद्र परदेशी, गणेश कालेकर यांना प्रत्येकी दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. 11 आरोपी निर्दोष सुटले आहेत. तर दोन पंचासह 15 साक्षीदार फितूर झाल्याने न्यायालयाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून त्यांची चौकशी केली जाणार आहे. खटल्याच्या प्रत्येक्ष कामाला 2019 पासून सुरवात झाली. यात 34 साक्षीदार तपासण्यात आले होते. आज नायालयाने आरोपीना शिक्षा सुनावल्याने गुन्हेगाराच्या समर्थकांची न्यायालयात गर्दी जमा झाली होती. त्यामुळे पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला होता.
संबधित बातमी वाचा :