Indurikar Maharaj : काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात नाशिकसह (Nashik) संगमनेर अहमदनगरमध्ये साजरा करण्यात आला. मात्र दुसरीकडे याच दिवशी बाळासाहेब थोरात यांनी विधीमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्याने चांगलीच खळबळ उडाली. दरम्यान दुसरीकडे वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या इंदुरीकर महाराजांच्या (Indurikar Maharaj) किर्तनाची चर्चा सध्या चांगली रंगली आहे. 


नाशिक पदवीधर निवडणुकीपासून काँग्रेसच्या (Congress) गोटात अस्वस्थता निर्माण झाल्याचे चित्र आहे. दुसरीकडे निवडणुकीत बाळासाहेब थोरात यांनी मौन धारण केल्याचे पाहायला मिळाले. निवडणूक झाली, सत्यजित तांबे निवडुनही आले. त्यानंतर तांबेची पत्रकार (Satyajeet Tambe) परिषद चांगलीच चर्चेतही आली. मात्र तरीदेखील बाळासाहेब थोरात यांची भूमिका मात्र स्पष्ट नव्हती. दरम्यान काल बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस पक्षाला जोरदार धक्का देत विधी मंडळ पक्षनेते पदाच्या राजीनाम्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली. विशेष म्हणजे काल त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. 


बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसचा गोटात असलेला वाद चव्हाट्यावर आला. त्याचबरोबर बाळासाहेब थोरात यांनी दिल्ली हायकमांडला नाराजीचं पत्र लिहल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चाना उधाण आले. मात्र, दुसरीकडे प्रसिद्ध इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला असून संगमनेरसह कॉंग्रेसच्या वर्तुळात त्या व्हिडीओचीच चर्चा आहे. बाळासाहेब थोरात यांचा 7 फेब्रुवारीला वाढदिवस होता. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संगमनेरमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, त्याच निमित्ताने सायंकाळी इंदुरीकर महाराजांचे किर्तनही आयोजित करण्यात आले होते.


इंदुरीकर महाराजांचे सर्वांनाच परिचित आहे. त्यांच्या विनोदी आणि मुद्द्यावर बोट ठेवणाऱ्या किर्तनामुळे ते देशभर प्रसिद्ध आहेत. बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त इंदुरीकर महाराजांच्या किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. इंदुरीकर महाराज या किर्तनात म्हणाले की, आजचा कार्यक्रम फक्त थोरात साहेबांवर असलेल्या श्रद्धेमुळे केला. उपस्थित सर्वांचे कौतुक, आपण सगळ्यांनी मिळून त्यांचा शंभरावा वाढदिवस सुद्धा साजरा करूयात. क्षेत्र कोणतेही असो आपला माणूस हा आपला स्वाभिमान असतो. थोरात साहेबांचे एक वाक्य नेहमीच लागू पडते, ते म्हणजे जी दगडं घाव सहन करतात. तीच दगडं मूर्ती बनवण्यासाठी वापरण्यात येतात.  अन् ज्यांच्यामध्ये घाव सहन करण्याची ताकद आहे, त्यांना यश निश्चित मिळत असल्याचे इंदुरीकर म्हणाले. 


व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल 


सध्या इंदुरीकर महाराजांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला असून या व्हिडीओत बाळासाहेब थोरात यांना शुभेच्छा देत आहेत. तसेच ते म्हणतात की, कोणत्याही दगडाची मूर्ती होत नाही. घाव सहन करणारे दगडचं मूर्तीसाठी वापरले जातात. ज्यांच्यात घाव सहन करण्याची ताकद आहे त्यांना यश निश्चित आहे. जी दगडं घाव सहन करतात तीच दगडं मूर्तीसाठी उपयोगी पडतात, हे वाक्य बाळासाहेब थोरात यांना लागू होतं. क्षेत्र कोणतंही असो, आपला माणूस हा आपला स्वाभिमान असतो असंही इंदुरीकर महाराज म्हणाले आहे.