Chhagan Bhujbal : अजित दादांच्या (Ajit Pawar) वाढदिवसानिमित्त रोजगार महोत्सव होत असून अजित पवार (Ajit Pawar Birthday) यांचा दररोज वाढदिवस आला पाहिजे, म्हणजे असा नोकरी महोत्सव भरवता येईल. असा नोकरी महोत्सव छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांच्याही जयंतीला आयोजित केला पाहिजे. एक दिवस डीजे लावून कार्यक्रम न करता असा कार्यक्रम दररोज करा, असे आवाहन मंत्री छगन भुजबळ यांनी केले. 


राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित नोकरी महोत्सवाचे (Job Fair) आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मंत्री छगन भुजबळ बोलत होते. भुजबळ म्हणाले की, "अजित पवार यांचा वाढदिवस दररोज साजरा केला पाहिजे, जेणेकरुन अनेक तरुण तरुणींना रोजगाराची संधी प्राप्त होईल. तसेच शिवाजी महाराज (Shiwaji Maharaj), बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar) यांच्याही जयंतीला असे कार्यक्रम घ्या, त्या दिवशी डीजे न लावता नोकरी महोत्सव भरवा, मला आनंद होईल. त्याचबरोबर 12 डिसेंबरला शरद पवार यांच्या वाढदिवसाला काही कार्यक्रम घेता येईल का, याचा विचार करा." 


छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) पुढे म्हणाले की, "उद्योग धंद्यांसंदर्भात काही करता येईल का, याचा विचार केला पाहिजे. यापूर्वी आपण अनेकांना कर्ज उपलब्ध करुन दिले असून 75 हजार युवकांना नोकरी देण्याचा मानस आहे. पूर्वीपेक्षा नाशिकमध्ये 15 ते 20 वर्षात आमूलाग्र बदल झाला. नाशिक-मुंबई रस्त्यात आत्ता खड्डे झाले असतील तरी मोठा रस्ता झाला असून त्र्यंबकेश्वर येथील मोठा रस्ता केला आहे. तसेच वणीला फ्युनिकीलर ट्रॉली केली आहे. हा सगळा विकास पाहून उद्योजक येतात. त्याचा शेतकऱ्यांना देखील याचा फायदा होतो. गंगापूर परिसरात बोट क्लब देखील सुरु केला असल्याने पर्यटकासंह उद्योजक हळूहळू येतात."


तसेच नाशिक (Nashik) जिल्ह्यात येणाऱ्या उद्योगमध्ये स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी, पूर्वीपासून आग्रही आहे. शिवसेनेच्या धर्तीवर स्थानीय लोकाधिकार समिति स्थापन करण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत. शिवसेनेत असताना स्थानीय लोकाधिकार समिती स्थापन झाली. त्यावेळी आमच्या स्थानिक लोकांना रोजगार द्या अशी मागणी केली होती. जिल्ह्यात कुठे कुठे उद्योग येताय, त्यात आमच्या लोकांना रोजगार द्या, एका जागेसाठी 10 जणांचे नावे द्या, मात्र यातून मोठा रोजगार निर्मिती होईल, असेही ते म्हणाले. 


50 पेक्षा अधिक कंपन्या सहभागी


नाशिक जिल्ह्यातील बेरोजगारांना सुवर्ण संधी उपलब्ध करुन देण्यासाठी नाशिक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने पुढाकार घेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य नोकरी महोत्सव आयोजित केला आहे. यामध्ये विविध नामवंत कंपन्या, उद्योग, कॉर्पोरेट, फायन्सस, सेवा या क्षेत्रातील जवळपास 50 पेक्षा अधिक कंपन्या सहभागी झाल्या असून नोकऱ्यांसाठी कंपन्यांकडून उमेदवारांच्या थेट मुलाखती घेतल्या जात आहेत. महोत्सवात दहावी, बारावी, पदवीधर, आयटीआय, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग पदवी यासह सर्वच विभागातील पात्रताधारक उमेदवारांसाठी संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. महोत्सवात नाशिक जिल्ह्यालगत असणाऱ्या विविध नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून मुलाखती घेण्यात येत आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या : 


Amit Shah On Ajit Pawar : अजितदादा, तुम्ही उशीर केलात, आता योग्य ठिकाणी बसले आहात; अमित शहाचं पुण्यातील जाहीर कार्यक्रमात मोठं वक्तव्य