Amit Shah : अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ते पहिल्यांदाच आपल्या कार्यक्रमात आहेत. माझ्यासोबत ते पहिल्यांदाच बसलेले आहेत, त्यामुळं सर्वात आधी मी त्यांना सांगू इच्छितो की, अजित दादा आज तुम्ही योग्य ठिकाणी बसलेला आहेत. हीच तुमची योग्य जागा आहे, याठिकाणी बसण्यासाठी तुम्ही थोडा उशीरच केला, असं मोठं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुण्यातील जाहीर कार्यक्रमात केलं आहे. 


...म्हणून मी महाराष्ट्रात सर्वांना घेऊन आलोय


देश एका बाजूला आहे आणि महाराष्ट्र एका बाजूला आहे. कारण देशातील सहकारी संस्थांच्या तुलनेत एकट्या महाराष्ट्राचा वाटा हा 42 टक्के आहे. महाराष्ट्राचं हेच योगदान दाखवण्यासाठी मी इथं सर्वांना घेऊन आलो आहे, असं ते म्हणाले. 


"सहकार क्षेत्राचा मोठा डेटा तयार होतोय'


सहकार क्षेत्राचा मोठा डेटा तयार होत आहे. त्यानुसार तुम्हाला तुमच्या गावात, जिल्ह्यात किंवा राज्यातील सहकार क्षेत्राशी संबंधित सगळी माहिती उपलब्ध होणार आहे. त्यामुळे प्रत्येक वरिष्ठांना आपल्या गावाची संपूर्ण माहिती लगेच मिळेल आणि उपाययोजना करण्यात येणार आहे.हा डेटा बनवण्याचं 95 टक्के काम पूर्ण झालं असल्याचं ते म्हणाले. 


महाराष्ट्रातील साखर कारखान्यांमध्ये इथेनॉलची निर्मिती व्हायलाच हवी - अमित शाह


आम्ही कायदा बदलून सहकार मतदारांना अधिकार दिले आहे.महाराष्ट्रातील प्रत्येक साखर कारखान्यात इथेनॉलची निर्मिती व्हायलाच हवी. यासाठी राज्य सरकारने पावलं उचलावीत. अशा सूचना मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुखमंत्र्यांनी आज सकाळच्या बैठकीतच दिलेल्या आहेत, असं त्यांनी स्पष्ट सांगितलं. आतापर्यंत 10 हजार कोटींची घोषणा केली मात्र जेवढे पैसे हवेत तेवढे देऊ, अशीही घोषणा त्यांनी केली आहे. 


'नातेवाईकांना नाही तर कौशल्य असलेल्याला मिळणार नोकरी'


केंद्र सरकारच्या आणि सहकार खात्याचं नेमकं व्हिजन काय आहे, हे त्यांनी सांगितलं आहे. त्यात सहकार क्षेत्राच्या अनेक निर्णयांमुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या समस्यांचं निराकरण झालं. कोणाच्याही नातेवाईकाला नोकरी मिळणार नाही तर फक्त कौशल्य असलेल्या व्यक्तीलाच नोकरी मिळणार असल्याचं ते म्हणाले. को-ऑपरेटिव्ह बॅंकांना मोठे अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे आता या पुढे सहकार क्षेत्राशी संबंधित पारदर्शक होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. 


उद्घाटनासाठी पुणं का निवडलं?


पुण्याला सहकाराची पंढरी म्हटलं जातं आणि  देशातील सहकारी संस्थांच्या तुलनेत एकट्या महाराष्ट्राचा वाटा हा 42 टक्के आहे. त्यामुळे उद्घाटनासाठी पुण्याची निवड केल्याचं ते म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या-


Pune Ajit Pawar : अमित शहाचं पुण्यावरचं प्रेम, मोदींच्या सुट्ट्या ते भाजपसोबत केलेली युती; अजित पवारांकडून मोदी-शहांचं तोंडभरुन कौतुक