Nashik Crime : मुलींनो सावधान! रात्रीचा रस्त्यानं प्रवास करत असाल आणि लिफ्ट मागत असाल तर असे काही तुमच्यासोबत घडू शकते. ठाण्यात (Thane) घडलेल्या रिक्षाचालकांच्या अजब कृत्यानंतर आता नाशिकच्या (Nashik) एका तरुणीला धक्कादायक अनुभव आला आहे. रात्रीच्या वेळी लीफ मागितल्यांनंतर संबंधित वाहन चालकाने तरुणीसोबत अश्लील कृत्य (Molestation) केल्याचे समोर आले आहे. 


नाशिकसह (Nashik) राज्यभरात मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न नित्याचा झाला असून दररोज विनयभंगासह अत्याचार, मारहाण करण्याच्या घटना समोर येत आहेत. ठाण्यात (Thane) मुलीला फरफटत नेणाऱ्या मुजोर रिक्षाचालकाची घटना ताजी असतानाच आता नाशिकमध्ये अशाच प्रकारची घटना उघडकीस आली आहे. नाशिक - औरंगाबाद महामार्गावरील नांदूरनाका ते माडसांगवी टोलनाक्या दरम्यान परवा रात्री साडेअकरा वाजेची घटना आहे. संबंधित 21 वर्षीय मुलगी लासलगाव येथे मामाच्या घरी जाण्यासाठी नांदूरनाका येथे उभे असताना लिप्ट घेण्यासाठी गाडीला हात दिला. यावेळी एका कारचालकाने कार थांबवुन संबंधित मुलीला लिफ्ट देत तिचा विनयभंग केल्यासच समोर आले आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लासलगाव येथे मामाच्या घरी जाण्यासाठी निघाली होती. दरम्यान एखाद्या गाडीला लिफ्ट देऊन घरी जाऊ या विचारात ती नांदुरनाका येथे उभी असताना लिप्ट घेण्यासाठी गाडीला हात दिला. यावेळी समोरून जाणाऱ्या संशयित कारचालकाने कार थांबवुन फिर्यादी यांना गाडीत बसविले. त्यानंतर काही अंतर पुढे गेल्यावर संशयित हा विचीत्र नजरेने बघत असल्याचे फिर्यादीच्या निदर्शनास येताच संशयितास सांगितले कि, मला मांडसांगवी टोलनाका येथे सोडन दया. यानंतर संशयिताने फिर्यादींसोबत अश्लील वर्तन केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. 


संशयित कारचालकाने चालत्या कारमध्ये फिर्यादीचा  विनयभंग करून शिवीगाळ करत बलात्काराची धमकी दिली. दरम्यान मुलीने आरडाओरड करताच टोलनाक्यावरील कर्मचारी मदतीला धावून आले, पोलिसांना पाचारण करताच मुलीची सुखरुप सुटका करण्यात आली. या प्रकरणी माडसांगवी परिसरात राहणाऱ्या चाळीस वर्षीय कारचालक प्रवीण पेखळेला पोलिसांनी अटक केली असून पुन्हा एकदा नाशिक शहरसह जिल्ह्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे वाहनांना लिफ्ट मागून तुम्ही जाणार असाल तर काळजी घेणे आवश्यक असल्याचे या घटनेवरून दिसून येते. 


ठाण्यातही रिक्षाचालकाची मुजोरी 
ठाण्यात (Thane) मुलीला फरफटत नेणाऱ्या रिक्षाचालकाला पोलिसांनी अटक केली आहे. दारुच्या नशेत हे कृत्य केल्याची कबुली आरोपी रिक्षाचालकानं दिली आहे. काल सकाळी 7 वाजता एक विद्यार्थिनी बाजारपेठेत पायी जात असताना रिश्रा चालकानं तिच्याकडे पाहून अश्लील हावभाव केले. मुलीनं त्याला जाब विचारल्यानंतर रिक्षाचालकानं तिचा हात पकडून फरफटत नेलं. पोलीस त्याचा शोध घेत होते. अखेर दिघा भागात राहणाऱ्या या रिक्षाचालकाला पोलिसांनी अटक केली आहे.