Thane Crime News : ठाण्यात (Thane) मुलीला फरफटत नेणाऱ्या रिक्षाचालकाला पोलिसांनी अटक केली आहे. दारुच्या नशेत हे कृत्य केल्याची कबुली आरोपी रिक्षाचालकानं दिली आहे. काल सकाळी 7 वाजता एक विद्यार्थिनी बाजारपेठेत पायी जात असताना रिश्रा चालकानं तिच्याकडे पाहून अश्लील हावभाव केले. मुलीनं त्याला जाब विचारल्यानंतर रिक्षाचालकानं तिचा हात पकडून फरफटत नेलं. पोलीस त्याचा शोध घेत होते. अखेर दिघा भागात राहणाऱ्या या रिक्षाचालकाला पोलिसांनी अटक केली आहे.
ठाण्यात मुलीला फरफटत नेणाऱ्या रिक्षाचालकाला पोलिसांनी अटक केली आहे. दारुच्या नशेत हे कृत्य केल्याची कबुली आरोपी रिक्षाचालकानं दिली आहे. दिघा भागात राहणारा आरोपी रिक्षाचालक कटिकादाला उर्फ राजू आब्बायी विरांगनेलू हा मूळचा आंध्र प्रदेशातला आहे. काल सकाळी 7 वाजता एक विद्यार्थिनी बाजारपेठेत पायी जात असताना रिक्षा चालकानं तिच्याकडे पाहून अश्लील हावभाव केले. मुलीनं त्याला जाब विचारल्यानंतर रिक्षाचालकानं तिचा हात पकडून फरफटत नेलं. त्यानंतर पोलीस त्याचा शोध घेत होते. अखेर त्याला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलं आहे.
प्रकरण नेमकं काय?
शुक्रवारी सकाळी 7 वाजता ही तरुणी बाजरपेठेत पायी जात होती. त्याचवेळी एक रिक्षा चालक त्याची रिक्षा घेऊन जात होता. या रिक्षा चालकानं तरुणीकडे पाहुन अश्लील हावभाव केले. या प्रकारानंतर तरूणीनं धाडस दाखवत रिक्षा चालकाला जाब विचारला. तसेच त्याला रिक्षातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु रिक्षा चालकानं रिक्षा सुरु केली. त्यानं तरुणीला फरफटत काही अंतर पुढे नेले. तरुणीच्या हाताला दुखापत झाल्यानं ती रस्त्यात पडली. त्यानंतर रिक्षाचालक स्थानकाच्या दिशेनं फरार झाला. दरम्यान, घटनेचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. ज्यावेळी हा प्रकार घडला त्यावेळी भाजपचे माजी नगरसेवक संजय वाघुले त्या परिसरात होते. संपूर्ण प्रकरण लक्षात आल्यानंतर त्यांनी ताबडतोब पोलिसांशी पाठपुरावा करून सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडे जमा केलं. त्यानंतर या तरुणीसोबत ठाणेनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे रिक्षाचा नंबर मिळवला आणि रिक्षाचालकाचा शोध सुरू केला. अखेर तब्बल 24 तासांनी मुजोर रिक्षाचालकाला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे.
पाहा व्हिडीओ : ठाण्यात रिक्षावाल्यानं मुलीला फरफडत नेलं, CCTV फुटेज समोर
दरम्यान, एबीपी माझानंही ठाण्यातील या मुजोर रिक्षावाल्याला तात्काळ शोधण्याचं आवाहन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना केलं होतं. अशा मुजोर रिक्षावाल्यांना चाप बसणं गरजेचं आहे. नाहीतर पुढे जाऊन असेच अनुचित प्रकार घडू शकतात. आता या रिक्षावाल्याला अटक करण्यात आली आहे. पण फक्त अटकच नाहीतर, या रिक्षावाल्यावर आता कठोर कारवाई होणं गरजेचं आहे. कारण अशा मुजोर रिक्षावाल्यांविरोधात जर कठोर कारवाई झाली नाहीतर उद्या आणखी तरुणी किंवा महिलेसोबत पुन्हा असा प्रकार करू शकतो. त्यामुळे या रिक्षावाल्यावर कठोर कारवाई करण्याचं आवाहन एबीपी माझा करत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :