Nashik Crime : केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (CBI) भारतीय लष्कराच्या हवाई (Cats) प्रशिक्षण केंद्रातील मेजर आणि ज्युनिअर इंजिनियरला लाच (Bribe) घेताना पकडले आहे. याची गंभीर दखल भारतीय लष्कराने घेतली असून लाचखोर मेजर हिमांशू मिश्रा आणि ज्युनिअर इंजिनियर मिलिंद वाडीले यांचे विरोधात कठोर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. त्याचबरोबर या दोघांना न्यायालयात (Nashik District Court) आज हजर केले असता 20 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.


नाशिक (Nashik) मध्ये लष्कराच्या हवाई प्रशिक्षणाचे केंद्र गांधीनगर परिसरात कार्यरत असून या ठिकाणी लष्कराच्या हेलिकॉप्टरचे प्रशिक्षण दिले जाते. म्हणजेच कॉम्बॅक्ट आर्मी रिलेशन स्कूल स्थापन करण्यात आले आहे. हे भारतातील एकमेव केंद्र असून विशेष म्हणजे याच केंद्राला प्रेसिडेंट कलर हा सर्वोच्च सन्मानही मिळाला आहे आणि याच केंद्रात सीबीआयच्या पथकाने मोठी कारवाई केली असून कॅटमध्ये कार्यरत असलेले मेजर हिमांशू मिश्रा आणि ज्युनिअर इंजिनियर मिलिंद वाडीले या दोघांना एक लाख वीस हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. या दोघा अधिकाऱ्यांनी एका कामासाठी कंत्राटदाराकडून लाच मागत असल्याची तक्रार सीबीआयला प्राप्त झाली. त्यानंतर सीबीआयच्या पथकाने सापळा रचला. या सापळ्यात हे दोघे सापडल्याचे सीबीआयचे लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक रणजीत पांडे यांनी सांगितले.


दरम्यान या घटनेनंतर लष्कर विभाग देखील सतर्क झाला असून दोघां लष्करी अधिकाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येत आहे. लष्कराने देखील आपल्या एका निवेदनात म्हटले आहे. केंद्रीय अन्वेषण ब्युरोला तपासणाऱ्या सर्वतोपरी मदत केली जाईल. भ्रष्टाचार विरुद्धच्या झिरो टॉलरन्स भूमिकेचा लष्कर पुनर्विचार करीत आहे. लष्कर अभियांत्रिकी सेवांमध्ये कार्यरत असलेला मेजर दर्जाचा अधिकारी आणि नागरी संरक्षण कर्मचारी यांचा समीक्ष असलेल्या तपासाबाबत लष्कराने समाधान व्यक्त केले आहे. भारतीय लष्करासारख्या शिस्तबद्ध संस्थेमध्ये कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारांना स्थान नाही. दोषींवर कठोर कारवाई सह शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असे लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.


सहा दिवसांची न्यायालयीन कोठडी
नाशकात लष्करी अधिकाऱ्याला लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर या दोघा अधिकाऱ्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना 20 तारखेपर्यंत न्यायालयीन कोचडी सुनावली आहे. दरम्यान लष्करी विभागात अशा प्रकारची कारवाई पहिल्यांदाच उघडकीस आली असून यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 


लाच मागितली नसल्याचा वकिलांचा दावा 
दरम्यान दोघा संशयित लाचखोर अधिकाऱ्यांना प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज न्यायालयात हजर केले. या गुन्ह्यांच्या पुढील तपासासाठी व संबंधित लष्करी अधिकाऱ्यांच्या घरच व्यक्तीसाठी सीबीआयकडून न्यायालयाकडे कोठडीची मागणी करण्यात आली न्यायालयाने 20 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. संशयित आरोपींनी लाच मागितली नसल्याचा दावा यावेळी संशयतांच्या वकिलांनी केला आहे. तक्रारदाराने स्वतःहून रक्कम आणून दिल्याचा आरोपही वकिलांनी न्यायालयात केला आहे. कामावरून वाद विवाद झाले होते. त्यामुळे अधिकाऱ्याला अडकवण्याचा हा प्रकार असल्याचे वकिलांनी सांगितले.